सुप्रियांच्या लाडक्या भावाने रंग बदलला, पिंक झाला पण रंग तर सरडा बदलतो; संजय राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut on Ajit Pawar on Pink Politics: गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जीण नाही, असे म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांच्या गुलाबी राजकरणाावर निशाणा साधला आहे.
मुंबई : महाविकासआघाडीच्य मेळाव्यात (Maha Vikas Aghadi Melava) महायुतीच्या लाडकी बहीण योजनेवर (Ladki Bahin Yojna) निशाणा साधला आहे. संजय राऊतांनी (Sanjay Raut On Ajit Pawar) नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे. सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला आता पिंक झाले आहेत, असे संजय राऊत म्हणाले. तुम्ही किती तोडा फोडा आमची एकी तुटणार नाही असे देखील संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला आता पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झाले. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे पण ते कुठे जाणार आहे हे माहीत नाही. पण एक सांगतो गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जीण नाही. आपला रंग भगवाच आहे. केसीआर यांचा पिंक रंग होता त्यांना सुद्धा आम्ही बोललो पिंक नही चलेंगा... एक तर भगवा चालेल नाहीतर तिरंगा चालेल. भगवाचं तिरंग्याला वाचवेल, असे बाळासाहेब म्हणायचे
महाराष्ट्राच्या दुश्मनांशी हातमिळवणी करेल त्यांना रस्त्यावर ठोकयचे. 50 खोके एकदम ओके, रस्त्यात दिसले तर ठोकेचं ठोके आता यांना विधानसभेमध्ये जाऊ द्यायचा नाही.विधानसभा निवडणुका जिंकल्यावर रस्त्यावर दिसले नाही पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत म्हणाले, लाडकी बहीण सारखा ढोंग कधीच पाहिला नाही. अनेक योजना आल्या आहे. सरकारी पैशाने मतं विकत घेण्याची ही योजना आहे. आमचा नातं पैशाच्या पलीकडे आहे.सरकार आपला येणार आणि अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांना माहिती आहे की पैसे तिजोरीत नसताना आणायचे कसे? पैसा येईल आमच्याकडे काळजी करू नका. महाविकास आघडीची एटीएम मशीन माझ्या मागे बसली आहे.