मोठी बातमी : 417 उमेदवारांना कृषी विभागात नियुक्त मिळण्याचा मार्ग मोकळा, न्यायालयाचा मोठा निर्णय
मुंबई : महाराष्ट्र आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झालाय.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2021 व 2022 मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या 417 उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग न्यायालयाच्या आजच्या निर्णयामुळे मोकळा झाला असून याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर या नियुक्त तातडीने अंतिम कराव्यात अशा सूचना धनंजय मुंडे यांनी विभागाला दिले असून लवकरच या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जातील अशी माहिती त्यांच्या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
याचिका दाखल झाल्यामुळे न्यायालयाने नियुक्तीस स्थगिती आदेश दिला होता
'कृषी सेवा परीक्षा 2021 व 2022' मधून कृषी उपसंचालक गट अ, तालुका कृषी अधिकारी गट-ब व मंडळ कृषी अधिकारी गट-ब (कनिष्ठ) या अधिकारी पदांवरील 417 उमेदवारांना नियुक्ती देण्याची प्रक्रिया कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यभार स्वीकारताच गतीने पूर्ण केली होती. मात्र या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल झाल्यामुळे न्यायालयाने नियुक्तीस स्थगिती आदेश दिला होता.
नियुक्तीअभावी या उमेदवारांपुढे अनेक प्रश्न निर्माण झाले. काही तरुण-तरुणी कुटुंबाला आधार देण्यासाठी खासगी कंपन्यांमध्ये नोकरी शोधली. विवाहाचे प्रश्न असून, वाढते वय यामुळे विद्यार्थी चिंताग्रस्त बनले होते. याबाबत कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी वैयक्तिक लक्ष देऊन न्यायालयीन प्रकरणाचा गतीने पाठपुरावा केला. न्यायालयात शासनाच्या वतीने वरिष्ठ वकील देण्यात आले. तसेच आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळे प्रकरण लवकर निकालात काढण्याची विनंती उच्च न्यायालयात करण्यात आली होती.
न्यायालयाकडून विरोधातील दोन्ही याचिका फेटाळण्यात आल्या
या प्रयत्नांना अखेर यश आले असून या प्रकरणातील दोन्ही याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या नियुक्त्या अंतिम कराव्यात अशा सूचना विभागाला मी आजच दिल्या आहेत. लवकरच या उमेदवारांना नियुक्त्या दिल्या जातील, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून दिली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत २०२१ व २०२२ मध्ये कृषी विभागात निवड झालेल्या ४१७ उमेदवारांच्या नियुक्तीची प्रक्रिया मी स्वतः लक्ष देऊन वेळेत पूर्ण केली होती. मात्र मा. न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे नियुक्त्या रखडल्या होत्या. या प्रकरणाचा मी वैयक्तिक पाठपुरावा करून न्यायालयात…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 3, 2024
इतर महत्त्वाच्या बातम्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI