Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
Prataprao Chikhalikar : ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख यांनी आक्षेपार्ह टीका केली म्हणून माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्या कार्यकर्यांनी त्याची बोटं छाटल्याचा प्रकार समोर आला होता.
Prataprao Chikhalikar, नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील उध्दव ठाकरे गटाचे उपतालुकाप्रमुख संतोषी वडवळे यांना भाजपा कार्यकर्त्यानी बेदम मारहाण करुन हाताची बोट छाटली. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या संदर्भाने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या कारणावरून भाजपा कार्यकर्त्यानी मारहाण केली. दरम्यान या घटनेमागे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे चिरंजीव प्रवीण पाटील चिखलीकर असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान याबाबत प्रतापराव चिखलीकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, मारहाणीचं समर्थन करत नाही, असं म्हणत चिखलीकरांनी पोस्ट करणाऱ्यालाच इशारा दिलाय.
पोस्ट टाकताना समोरच्या नेत्याची स्वत:ची उंची पहिली पाहिजे : प्रतापराव चिखलीकर
मारहाणीचे समर्थन मी करत नाही पण पोस्ट टाकताना आपली पात्रता आणि समोरच्या नेत्याची उंची पहिली पाहिजे,अशी प्रतिक्रिया माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. मारहाण करणे चुकीचे आहे. ज्यांनी मारहाण केली मी त्यांना समज देतो असंही चिखलीकर म्हणाले. मी चार दिवसापासून मुंबईत आणि प्रवीण चिखलीकर कुबेरला आहेत. आमची नावे घेतली जात त्यात तथ्य नाही, असं स्पष्टीकरणही प्रतापराव चिखलीकर यांनी दिलं.
उपशहरप्रमुख आणि त्याच्या वडीलांवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल
नांदेडमध्ये फेसबुक पोस्ट टाकण्याच्या कारणावरून ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखास मारहाण करत तलवारीने बोट छाटल्याचे प्रकरण समोर आला असताना जखमी उपशहरप्रमुख आणि त्याच्या वडीलांवर अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 1 ऑक्टोबर रोजी ज्या दिवशी उपशहरप्रमुख संतोष वडवळे यांचे अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली. त्याच्या एक तास आगोदर फिर्यादी बालाजी कोकरे यांना संतोष वडवळे आणि त्यांच्या वडील आणि भावाने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
फिर्यादीला मारहाण करत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि अंगठी काढून घेण्यात आली. या आरोपावरून काल 3 ऑक्टोबर रोजी फिर्यादीने पोलीस स्टेशनमध्ये येऊन याबाबत तक्रार दिली. या तक्रारीवरून संतोष वडवळेसह त्यांच्या वडिलांवर आणि अॅट्रोसिटी अंतर्गत दरोडा, मारहाण आणि इतर कलामानव्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या