Madha Assembly constituency : अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली
Madha Assembly constituency : माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी रणजीत शिंदे यांनी हालचाली सुरु केल्या आहेत.
Madha Assembly constituency : काही दिवसांपूर्वी माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांनी मोठी घोषणा केली होती. मी आता उभा राहणार नाही, मुलाला उभा करणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. शिवाय महायुतीचा विषय संपला. आम्ही शरद पवारांकडे मुलासाठी उमेदवारी मागणार आहोत. नाही मिळाली तर अपक्ष लढू, असंही शिंदे यांनी सांगितलं. दरम्यान, आता बबनदादा शिंदे यांचे पुत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत.
माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी रणजीत शिदेंच्या हालचाली
माढा मतदारसंघाचे अजित पवार पक्षाचे आमदार बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजीत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीला मुंबईतील पक्ष कार्यालयात दाखल झाले आहेत. सध्या,माढा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे हे अजित पवार यांच्या पक्षाकडे आहेत. मात्र स्थानिक माढा मतदारसंघातील समीकरण पाहता आगामी विधानसभेत आमदार बबन शिंदे हे शरद पवार कुटुंबातील मुलाला म्हणजेच रणजीत शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र सातत्याने भूमिका बदलल्यामुळे आगामी काळामध्ये शिंदे बंधूंना स्थानिक मतदार किती पाठिंबा देणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.
अभिजीत पाटील अन् रणजीत मोहितेंचेही माढ्यासाठी नाव चर्चेत
माढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अभिजीत पाटील यांनीही शरद पवारांकडे मुलाखत दिली आहे. शिवाय, शिंदे बंधूंच्या विरोधात मोहिते पाटील कुटुंबियही आक्रमक आहेत. माढा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवण्यासाठी मोहिते पाटील 2004 पासून प्रयत्न करत असल्याचे बोलले जाते. मात्र, अजित पवार यांनी शिंदे कुटुंबियांना बळ दिल्यामुळे मोहिते पाटील यापूर्वी अनेकदा नाराज झाल्याचे बोलले जाते.
दरम्यान, बबन शिंदे यांच्या मनात काय आहे? हे अजून मला माहिती नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. काही वेळापूर्वी सचिन खरात यांनी देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सचिन खरात म्हणाले, अजित पवारांसोबत गेलो ही चूक होती. त्यापूर्वी 10 वर्ष आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत आणि आता देखील राहणार आहे. भीमा कोरेगाव 100 कोटी रुपये दिले म्हणतात परंतु अजूपर्यंत त्याबाबत काहीच हालचाल झाली नाही. सावरकर ट्रस्टला पावणे तीन एकर जागा न मागता देण्यात आली. मात्र आम्ही आंबेडकरी ट्रस्टसाठी जागा मागत आहोत अजून दिली जत नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या