मोठी बातमी! कोस्टल रोडच्या कामात तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून वसुली, फडणवींसाचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
Devendra Fadnavis Speech : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वेग आल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना चिमटा काढला आहे.

Costal Road Project : देशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबईतील वरळी ते मरिनलाईन्स सागरी सेतू मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे आज लोकार्पण करण्यात आलं. मात्र या लोकार्पणा दरम्यान केलेल्या भाषणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आमदार आदित्य ठाकरेंवर (Aditya Thackeray) जोरदार टीका केली आहे. कोस्टल रोड, मुंबईकरांसाठी फायदेशीर ठरणारा हा महत्वाचा प्रकल्प. अनेक वर्षे याच कोस्टल रोडवरून झालेले वाद देखील सर्वानी पाहिले आहेत.याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट वाचा.
कोस्टल रोडवरून फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा
नेहमीच चर्चेत असलेल्या या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण अखेर झालं. या लोकापर्णच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. काही लोक फेसबुक, इंस्टाग्राम आणि फेसबुक लाईव्ह करुन कोस्टल रोड प्रकल्पाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. पण या प्रकल्पाच्या कामाला राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने वेग आल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना चिमटा काढला आहे.
फडणवींसाचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
देवेंद्र फडणवीस एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कोस्टल रोडच्या कामासाठी तत्कालीन मुख्यमंत्री कशाप्रकारे वसुली करायचे याचा तपशील मांडला. कोस्टल रोडमध्ये आमच्याच लोकांना विशिष्ट रेटने काम द्या, असं सांगितलं जायचं. त्यावेळी याभागात कोण आमदार होते, हे सगळ्यांना माहिती आहे, मी त्याविषयी बोलणार नाही, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंवर फडणवीसांचा जोरदार प्रहार
एवढंच नाही तर मी सगळं करून आणलं पण ज्यावेळी भूमिपूजन करायचं होतं, त्यावेळी मी मुख्यमंत्री होतो, पण उद्धव ठाकरेंनी मला बोलवलं देखील नाही. त्यावेळी मी सगळं रोखू शकलो असतो. परंतु मी तसे केलं नसल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला आहे.
फडणवीसांच्या आरोपांना उद्धव ठाकरे उत्तर देणार
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप ठाकरे गटाच्या चांगलेच जिव्हारी लागले आहेत. ठाकरे गटाकडूनही देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर देण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांना आता उद्धव ठाकरे काय उत्तर देतात, हे पाहणं तितकंच महत्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या
Sharad Pawar : सुप्रियाला मंत्री करण्याचा अधिकार असतानाही कधी तिचा विचार केला नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
