Sharad Pawar : सुप्रियाला मंत्री करण्याचा अधिकार असतानाही कधी तिचा विचार केला नाही, शरद पवारांचं मोठं वक्तव्य
Sharad Pawar on Supriya Sule : 'सुप्रियाला मंत्री करण्याचा अधिकार असताना मी सुप्रियाचा विचार कधी केला नाही', असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
Maharashtra News : शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुलगी सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना मंत्रिपद देण्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. संधी असतानाही सुप्रियाला मंत्री बनवण्याचा विचार केला नाही, असं शरद पवारांनी सांगितलं आहे. 'सुप्रियाला मंत्री करण्याचा अधिकार असताना मी सुप्रियाचा विचार कधी केला नाही', असं मोठं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे
'अधिकार असताना मी सुप्रियाचा विचार कधी केला नाही'
इंदिरा गांधी यांनी देशाची प्रतिष्ठा वाढवली. महत्त्वाचा अधिकार असलेले व्यक्ती मी आहे. माझ्या अधिकाराचा उपयोग कधी मी मुलीसाठी केला नाही. मंत्री करण्याचा अधिकार असताना मी सुप्रियाचा विचार कधी केला नाही, अन्य लोकांचा विचार मी केला नाही. संसदेची स्थिती चिंता करण्यासारखी आहे. भाजप संविधान बदलायला निघाले आहेत, म्हणून मी इतकं लक्ष निवडणूक मध्ये घातले आहे. याआधी मी कधी एवढं लक्ष घातले नाही.
'कर्तृत्ववान फक्त मुले असतात, हे डोक्यातून काढा'
शरद पवार यांनी पुढे म्हटलं की, उमेदवाराचा विचार करताना क्वालिटीचा विचार तुम्ही करावा. लोकांच्या आयुष्यात बदल करू शकलो तर, आपल्या पदाचा उपयोग होतो. आधी शिक्षण म्हटलं की, मुंबई किंवा पुणे याशिवाय पर्याय नव्हता, आता शैक्षणिक हब बारामती म्हणून बघितले जातात. कृषी विकास प्रतिष्ठान आणि विद्या प्रतिष्ठान या संस्था काढल्या. कृषी विकास प्रतिष्ठान हे देशातील पहिल्या तीनमध्ये त्याचा नंबर लागतो. डोनेशन नावाचा प्रकार इथे नाही, इथे ही संस्कृती नाही. कर्तृत्ववान फक्त मुले असतात, हे डोक्यातून काढा. मुलींना संधी मिळाली तर, त्या कर्तृत्व सिध्द करतील.
आता निवडणुकीसाठी पैशाचा, सत्तेचा, यंत्रणेचा वापर
त्यांनी पुढे म्हटलं की, मी जेव्हा निवडणुकीला उभा राहिलो, तेव्हा निवडणुकीला खर्च येत नसे. लोकांची बांधिलकी लोकं बघायचे. आजच्या आणि त्या काळच्या निवडणुकीत जमीन अस्मानाचा फरक होता. पैशाचा, सत्तेचा, यंत्रणेचा वापर होत नव्हता. लोकं वाटेल त्याला निवडून द्यायचे. शरद पवार यावेळी म्हणाले की, काम करीत असताना कधी मी पक्षाचा विचार केला नाही, विचारांशी पक्की राहण्याची भूमिका बारामतीच्या लोकांची आहे. त्यामुळे मी 50 वर्ष निवडून येतोय. माझ्या पहिल्या निवडणूक होती, तेव्हा एक डॉक्टर माझा प्रचार करायचे, तो पेशंट आला की, इंजेक्शन देताना विचारायचे मत कुणाला देणार, असंही शरद पवारांनी सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :