Ashok Chavan on Majha Katta : मुलगी विधानससभा निवडणूक लढवणार का? अशोक चव्हाणांनी 'माझा कट्ट्या'वर स्पष्टच सागितलं
Ashok Chavan on Majha Katta : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर त्यांची मुलगी विधानसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरु होत्या. या प्रश्नावर अशोक चव्हाण यांनी 'माझा कट्ट्या'वर भाष्य केलं आहे.
Ashok Chavan on Majha Katta : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर त्यांची मुलगी विधानसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरु होत्या. या प्रश्नावर अशोक चव्हाण यांनी 'माझा कट्ट्या'वर भाष्य केलं आहे. "माझ्या मुलीची चॉईस मला कळत नाही. तिच्या मनात काय आहे हे मलाही समजत नाही. माझ्यावर सुरुवातीपासून घराणेशाही,शंकरराव चव्हाण यांचा मुलगा अशी लेबलं लावण्यात येत होती. वयाच्या 26 वर्षी माझ्या घराणेशाहीचा शिक्का होता. ज्यांनी आरोप केले त्यांचे नातेवाईक राजकारणात आले त्यामुळे नंतर चर्चा बंद झाली, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
'माझ्यावर अनेकांनी कट केले,मला कधी कट करायला जमले नाही'
अशोक चव्हाण म्हणाले, मी राहुल गांधी यांची तुलना मोदींशी करत नाही. त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे. पीएम मोदींचा काम करण्याचा एक वेगळा ओरा आहे. इतक्या लवकर मी राजकीय क्षेत्र सोडणार नाही. वयाच्या 65 व्या वर्षी आपल्याला काम करण्याची संधी मिळेल. सभागृहात मी माझ्या पद्धतीने चांगल काम केलंय. काल बऱ्याच वर्षांनी नारायण राणेंचा फोन आला. तुमच स्वागत आणि अभिनंदन. माझे आणि नारायण राणेंचे चांगले संबंध आहेत. काल फोन आल्यावर मला बर वाटलं. मित्रत्वाचे संबंध आहेत. नारायण राणे धाडसी माणूस आहेत. ज्यांच्याबरोबर मी 40 वर्षे राहिलो त्यांना 48 तासांत शिव्या देईल, असे कधीच होणार नाही. माझ्यावर अनेकांनी कट केले. मला कधी कट करायला जमले नाही. महाराष्ट्रात घोडे बाजार झालेला आहे. माझ्यावर व्यक्तीगत कोणी आरोप करत असेल तर गेल्या दोन वर्षात का बोलले नाहीत, असा सवालही चव्हाण यांनी यावेळी बोलताना केला.
श्वेतपत्रिकेचा आणि माझ्या प्रवेशाचा काही संबंध नाही
श्वेतपत्रिकेचा आणि माझ्या प्रवेशाचा काही संबंध नाही. दर पाच वर्षाला हा विषय काढतात. या विषयानंतर मी दोनदा निवडून आलो. विधानसभा दोनदा लढलो आणि निवडून आलो. सातत्याने वर्ष दीड वर्षात वाटत होते की बदल होईल. मी अनेक बैठकांना जात होतो. मात्र, राजकीय ठराव होत होते. मात्र त्याची अंमलबजावणी झालीच नाही. मी महाराष्ट्रात अनेक कार्यकर्ते घडवले, नेते घडवले. हे जे रोज सुरु आहे. ते लोकांना आवडत नाही.
आजही मला कोणावर व्यक्तीगत आरोप करायचे नाहीत.
'लोकांना अपेक्षा असते की सत्तेत यावे'
भाजपकडे इंटेलिजन्स आहे. प्रवेशाबाबत योग्यवेळी खुलासा करेन. गोबेल्स थेरी प्रमाणे जाणार जाणार असे बोलले जात होते. ज्याने त्याने योग्य निर्णय घ्यायचे असतात. काँग्रेसमध्ये जो राहिल तो त्याच्या बळावर निवडून येईल. लोकांना अपेक्षा असते की सत्तेत यावे. माझ्या पक्षाबाबत बाहेर बोलणे वाईट आहे. महाराष्ट्रात राजकीय टीका होतात, त्या वाईट आहेत. लोकांना वाटत प्रसिद्धी मिळते. मात्र, असे अजिबात नाही.
इतर महत्वाच्या बातम्या