मुख्यमंत्र्यांच्या कानावर या गोष्टी जात कशा नाहीत; धनंजय मुंडेंविरुद्ध कोर्टाच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंचा सवाल
राज्य सरकारकडून शिवभोजन थाळी बंद करण्यात येत असून लाडकी बहीण योजनेवरही निर्बंध घातले जात आहेत.

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) आणि करुणा शर्मा यांच्यातील कौटुंबीक वादावर न्यायालयातील सुनावणीत न्यायालयाने करुणा शर्मा यांच्या बाजुने निर्णय दिला. करुणा शर्मा यांना 2 लाख रुपये दरमहा पोटगी देण्याचे आदेशच वांद्रे कोर्टाने दिले असून धनंजय मुंडेंना ही कोर्टाची चपराक असल्याचं बोललं जात आहे. या निर्णयानंतर करुणा शर्मा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना न्यायालयाचे आभार मानले असून न्यायालयावर आपल्याला विश्वास आहे, असे म्हटले. यावेळी, त्यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान, याप्रकरणी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा टोकियोला जाणार आहे, त्याचं स्वागत आम्ही वरळी मुंबईमध्ये करू शकलो याचं भाग्य समजतो, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तर दिली. यावेळी, धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यातील न्यायालयाच्या निर्णयावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्री पदावर असेल त्या व्यक्तीवर अशा प्रकारे न्यायालयाकडून ताशेरे ओढले जातात हे धक्कादायक असल्याचं ते म्हणाले.
राज्य सरकारकडून शिवभोजन थाळी बंद करण्यात येत असून लाडकी बहीण योजनेवरही निर्बंध घातले जात आहेत. त्याच अनुषंगाने, या योजनांवर ब्रेक लावण्यापेक्षा जे साथी त्यांच्यासोबत आहेत, जे भ्रष्टाचार करत आहेत त्यांना ब्रेक लावा, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी नाव न घेता धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं. तसेच, वांद्रे कोर्टाने धनंजय मुंडे व करुणा शर्मा यांच्यासंदर्भातील याचिकेवर दिलेल्या सुनावणीवरही त्यांनी भाष्य केलं. ''हे धक्कादायक आहे, मंत्री पदावर असेल त्या व्यक्तीवर अशा प्रकारे न्यायालयाकडून ताशेरे ओढले जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कानावर या कोणत्याही गोष्टी जात कशा नाहीत?'', असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
दरम्यान, मुंबईत रस्ता घोटाळा झाला आहे, हे मी आधीपासून सांगत आहे. पण, आयुक्तांनी तो एक्सपोज केला. एकनाथ शिंदे यांच्या खोटारडेपणाला त्यांनी समोर आणलं. माझा चॅलेंज आहे, 26 टक्के रस्ते पूर्ण झाले आहेत, हे तुम्ही दाखवा. केवळ पाच टक्क्यांपेक्षा जास्त कुठेही रस्ते झाले नाहीत, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
आनंदाचा शिधामध्ये मोठा भ्रष्टाचार
शिवभोजन आणि आनंदाचा शिधा यासंदर्भात बोलताना, 1 लाख कोटींची बिलं अजून थकलेली आहेत, कंत्राटदारांनी एक दिवसाचा बंद पाळला पाहिजे. आर्थिक आणि राजकीय शिस्त सरकारने स्वतःला लावणं गरजेचं आहे, कॉन्ट्रॅक्टर्ससाठीची उधळपट्टी बंद करा. शिवभोजन थाळी आम्ही सुरू केली होती, कोरोनामध्ये मोफत जेवण मिळायचं. आनंदाचा शिधामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. तसेच, बाकीचे काम करणाऱ्यांची बिलं थकवायची आणि लाडक्या कॉन्ट्रॅक्टरची उधळपट्टी करायची, असं सरकारचं काम असल्याची टाका आदित्य ठाकरे यांनी केली.
हेही वाचा
तंगडे तोडू, जीवे मारू, ठोकून काढू; बीडमधील झांजे महाराजांना धमकी, पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
