Vasai-Virar Ward Reservation: वसई विरार पालिकेची पुन्हा नव्याने आरक्षण सोडत, ओबीसींसाठी 34 जागा राखीव
Vasai-Virar Ward Reservation: वसई-विरार महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी ओबीसी साठी नव्याने आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे.
Vasai-Virar Ward Reservation: वसई-विरार महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीसाठी ओबीसी साठी नव्याने आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली आहे. एकूण 126 जागांसाठी ही निवडून होणार असून 42 प्रभाग असणार आहेत. सर्वसाधारण महिला आणि नागरिकांच मागास प्रवर्ग महिला या दोन टप्यात आज आरक्षण जाहीर झालं आहे. यापूर्वी सोडतीत काढलेले आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांना आरक्षण लागू केल्याने राहिलेल्या ओबीसी जागासाठी आज आरक्षण काडण्यात आले.
अनुसूचित जातीकरता 5 जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 3 जागा महिलांना करीत राखीव आहेत. अनुसूचित जमातीकर्ता 6 जागा आरक्षित आहेत. त्यापैकी 3 जागा महिलांकरिता राखीव आहेत. तर OBC साठी 34 जागा सोडण्यात आल्या आहेत. उर्वरित 81 जागा सर्वसाधारण आहेत. OBC आरक्षण जाहीर झाल्यानंतर आज वसई-विरार महापालिकेची आरक्षण सोडत आज नव्याने जाहीर करण्यात आली असली तरी याचा फटका काही नगरसेवकांना बसला आहे. तर बहुतेकांना फायदाच झाला आहे.
1. माजी महापौर प्रवीण शेट्टी यांचा पुर्वीचा प्रभाग 110 आताचा प्रभाग 39 – त्यांच्यासाठी प्रभाग त्यांच्यासाठी सेफ झाला आहे.
2. माजी महापौर रुपेश जाधव यांचा पूर्वीचा प्रभाग 80 आताचा प्रभाग 29 – त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.
3. शिवसेनच्या गटनेत्या किरण चेंदवणकर यांचा पूर्वीचा प्रभाग 96 आताचा प्रभाग 36 – त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.
4. शिवसेनचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांचा पूर्वीचा प्रभाग 62 आताचा प्रभाग 22 – त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.
5. बविआचे नगरसेवक माजी स्थायी सभापती प्रशांत राउत यांचा पूर्वीचा प्रभाग 30 आताचा प्रभाग 11 आणि 12 – त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.
6. बहुजन विकास आघाडीचे जेष्ठ नेते, आणि आमदार हितेंद्र ठाकूरांचे बंधू पंकज ठाकूर यांचा पूर्वीचा प्रभाग 31 आताचा प्रभाग 10 – त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.
7. बविआचे जेष्ठ नेते आणि माजी उपमहापौर उमेश नाईक यांचा पूर्वीचा प्रभाग 48 आताचा प्रभाग 14 – त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.
8. शिवसेनेच्या माजी नगरसेविका शिल्पा सिंग यांचा पूर्वीचा प्रभाग 77 आताचा प्रभाग 28 – त्यांच्या प्रभागात एक पुरुष सर्वसाधारण गटात तर दोन महिला एक अनुसुचीत जाती आणि दुसरी अनुसुचीत जमातीसाठी आरक्षण पडल्याने त्यांची जागी धोक्यात आली आहे. सर्वसाधारण पुरुष गटातून त्यांना निवडणुक लढवावी लागेल.
9. भाजपाचे एकमेव माजी नगरसेवक किरण भोईर यांचा पूर्वीचा प्रभाग 86 आताचा प्रभाग 29 – त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.
10. अपक्ष म्हणून निवडणूक जिंकलेले मनसेचे पदाधिकारी प्रफुल पाटील यांचा पूर्वीचा प्रभाग 73 आताचा प्रभाग 26 – त्यांच्यासाठी त्यांचा प्रभाग सेफ झाला आहे.