एक्स्प्लोर

Dindori Loksabha : वंचितचा उमेदवार बदलाबदलीचा खेळखंडोबा सुरुच; आता दिंडोरीत उमेदवार बदलला

Dindori Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार बदलीचा खेळखंडोबा सुरूच आहे. आता दिंडोरीतील उमेदवार बदलण्यात आला आहे.

Dindori Lok Sabha Election 2024 : माकपचे माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) यांनी दिंडोरीच्या जागेची मागणी केली आहे. ही जागा आम्हाला सोडली नाही तर शरद पवार (Sharad Pawar) गटाचे उमेदवार भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांना पडण्याचा थेट इशारा त्यांनी दिला आहे. यामुळे दिंडोरी लोकसभा सध्या राज्यभर गाजत आहे. दिंडोरीचे राजकारण तापलेले असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे (Vanit Bahujan Aghadi)अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिंडोरीचा उमेदवार बदलला आहे. 

एकीकडे महायुतीत (Mahayuti Seat Sharing) अजूनही काही जागांचे वाटप झालेले नाही. त्यात वंचितकडून उमेदवार बदलीचा खेळखंडोबा सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली होती. या यादीत दिंडोरी लोकसभेचा समावेश होता. मात्र अचानकपणे प्रकाश आंबेडकरांनी दिंडोरीचा उमेदवार बदलला आहे. 

वंचितकडून मालती शंकर थविल यांना उमेदवारी

वंचित बहुजन आघाडीच्या पाचव्या यादीत दिंडोरी लोकसभेसाठी गुलाब मोहन बर्डे यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र त्यांच्याकडून आरोग्याच्या कारणास्तव माघार घेतल्यानंतर नवा उमेदवार दिंडोरीतून देण्यात आलाय. आता वंचितकडून मालती शंकर थविल (Malati Shankar Thavil) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिंडोरीचा उमेदवार नेमका का बदलला? याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. 

दिंडोरीत तिरंगी लढत 

दरम्यान, दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आता भाजपकडून डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar), शरद पवार गटाकडून भास्कर भगरे आणि वंचित बहुजन आघाडीकडून मालती थविल यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून नक्की कोण बाजी मारणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Dindori Loksabha : 'दिंडोरीची जागा माकपला द्या, अन्यथा तुमचा उमेदवार पडणारच', जे पी गावितांचा शरद पवारांना थेट इशारा

Prakash Ambedkar : भाजपासोबत कधीही समझोता करणार नाही, तुमची लढाई लढण्यासाठी मला लोकसभेत पाठवा; प्रकाश आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पॅरोलवर सुट्टी संपली, तुरुंगात परतण्याआधीच तरुणानं प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल, ‘लिव्ह इन रिलेशनशिप'चा भयंकर शेवट
पॅरोलवर सुट्टी संपली, तुरुंगात परतण्याआधीच तरुणानं प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल, ‘लिव्ह इन रिलेशनशिप'चा भयंकर शेवट
Beed Crime: कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, बीड पोलिसांनी झटपट अंत्यविधीही उरकला, आता नवी अपडेट समोर
कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, झटपट अंत्यविधीही उरकला, नवी अपडेट समोर
Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
प्रेयसीचा लिव्ह इनमध्ये राहायला नकार, प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kalamb Lady Death : त्या महिलेचा मृतदेह ज्या घरात सापडला त्या घराबाहेरुन आढावाSantosh Deshmukh and Kalamb Lady : देशमुखांना खोट्या अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याचा होता प्लान, गोपनीय साक्षीदाराची साक्षABP Majha Marathi News Headlines 08AM TOP Headlines 08 AM 01 April 2025Majha Gaon Majha Jilha | माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा सुपरफास्ट आढावा :01 April 2025 : 7 AM

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पॅरोलवर सुट्टी संपली, तुरुंगात परतण्याआधीच तरुणानं प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल, ‘लिव्ह इन रिलेशनशिप'चा भयंकर शेवट
पॅरोलवर सुट्टी संपली, तुरुंगात परतण्याआधीच तरुणानं प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल, ‘लिव्ह इन रिलेशनशिप'चा भयंकर शेवट
Beed Crime: कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, बीड पोलिसांनी झटपट अंत्यविधीही उरकला, आता नवी अपडेट समोर
कळंबमध्ये 'त्या' महिलेच्या सडलेल्या मृतदेहाचं जागेवरच पोस्टमार्टेम, झटपट अंत्यविधीही उरकला, नवी अपडेट समोर
Mumbai Crime: नायगावमध्ये प्रेयसीने लिव्ह-इनमध्ये राहायला नकार दिला, प्रियकराने आयुष्य संपवलं, मग तिनेही.... प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
प्रेयसीचा लिव्ह इनमध्ये राहायला नकार, प्रेमकहाणीच्या 'एक दुजे के लिए' स्टाईल शेवटाने नायगाव हादरलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Beed : बीडच्या 'त्या' महिलेचा खून? सरपंच हत्या प्रकरणाचे गूढ वाढलं
Jail Rules : पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
पती-पत्नी तुरुंगात एकत्रित राहू शकतात का? काय आहेत नियम? 
Suresh Dhas Beed Crime: खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट आखला होता, राजस्थानातून मारेकरी आले होते; सुरेश धस यांचा खळबळजनक दावा
खोक्या प्रकरणात मला व्हिलन ठरवून माझ्या खुनाचा कट, राजस्थानातून मारेकरी आले होते; सुरेश धस यांचा खळबळजनक दावा
EPFO चं मोठं पाऊल, ऑटो-सेटलमेंटची मर्यादा 1 लाखांवरुन 5 लाखांवर नेणार, यूपीआय अन् एटीएममधून पैसे काढता येणार
ईपीएफओचे दोन क्रांतिकारी निर्णय, ऑटो-सेटलमेंटची रक्कम 5 लाखांवर नेणार तर....
Indian Army : इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, अर्ज करण्यासाठी राहिले शेवटचे काही दिवस
इंडियन आर्मीमध्ये अग्नीवीर म्हणून काम करण्याची संधी, 21 ते 28 हजार रुपये दरमहा मिळणार, जाणून घ्या प्रक्रिया
Embed widget