एक्स्प्लोर

Dindori Loksabha : 'दिंडोरीची जागा माकपला द्या, अन्यथा तुमचा उमेदवार पडणारच', जे पी गावितांचा शरद पवारांना थेट इशारा

Dindori Loksabha : दिंडोरीची जागा माकपला द्यावी, अन्यथा तुमचे उमदेवार भास्कर भगरेंना पडणारच, असा इशारा जे पी यांनी शरद पवारांना जाहीर सभेतून दिला आहे.

Dindori loksabha Election 2024 : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून (BJP) पुन्हा एकदा खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र दिंडोरीतून माकपचे माजी आमदार जे पी गावित (J P Gavit) हे लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. 

जे पी गावित यांनी महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी केली होती. मात्र त्यांची मागणी पूर्ण होऊ शकली नाही. शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळे आता जे पी गावित यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आज जाहीर सभा घेत त्यांना शरद पवारांना उमेदवार बदला नाहीतर उमेदवाराला पाडू असा इशारा दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. 

दिंडोरीची जागा माकपला द्यावी

महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांना बदला. इंडिया आघाडीने ही जागा माकपला द्यावी. नाहीतर तुमचा उमेदवार पडणारच, असा इशारा त्यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) दिला आहे. महाविकास आघाडी असो किंवा माकपने उमेदवारी दिली नाही तरी अपक्ष लढण्यावर जे पी गावीत ठाम आहेत. दिंडोरीत जाहीर सभा घेत जे पी गावित यांनी महाविकास आघाडी विरोधात एल्गार पुकारला आहे. या सभेला शेतकरी आणि आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

जे पी गावितांचा भाजपवर निशाणा 

द्राक्ष विकले व्यापारी पळून गेला. सरकार काहीच करू शकत नाही. येवल्याचा व्यापारी माझ्याकडे आला होता. मी हस्तक्षेप केला. केरळच्या व्यापाऱ्याने फसवणूक केली होती. मी पैसे मिळवून दिले.  देशाच्या लोकशाहीची निवडणूक होत आहे.  400 पारचा नारा भाजप देत आहे.  त्यांना संविधान बदलायचे आहे. त्यासाठी त्यांना 400 पार करायचे आहे. 10 वर्षात कायद्याचा गैरवापर करून दडपशाही निर्माण करण्यात आली आहे.  सरकार जे करेल ते तुम्हाला मान्य करावे लागेल. शिवसेनेचे (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीचे (NCP) दोन तुकडे केले. अशोक चव्हाणांवर (Ashok Chavan) दडपण आणले आणि त्यांना घेतले. भाजप 400 च्या वर गेले तर संविधान गुंडाळून फेकून देतील, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.

शरद पवारांनी लक्षात ठेवावे नाहीतर...

हुकूमशाहीच्या दिशेने भाजप सरकार वाटचाल करत आहे. त्यासाठी आमच्यासारखे नेते संसदेत गेले पाहिजे. जे जातात ते तिथं जाऊन शांत बसतात. रस्त्याचा आणि पाण्याचा प्रश्न आहे. द्राक्ष आणि कांद्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही निवडणूक लढतोय. ही जागा इंडिया आघाडीने आम्हाला सोडावी, अशी मागणी अजूनही आहे. शरद पवारांनी लक्षात ठेवावे नाहीतर तुमचा उमेदवार पडतोच आहे, असा इशारा त्यांनी दिला आहे. आम्ही मार्क्सवादी पक्षाचा उमेदवार नक्की निवडून आणू. पहिल्या सभेला 50 हजार लोक उपस्थित राहिले.  मोदींच्या सभेला सुद्धा इतके लोक उपस्थित राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले. 

जे पी गावितांचा भास्कर भगरेंना टोला 

दिंडोरी लोकसभेची जागा नक्कीच जिंकू शकतो. अजून एक महिना बाकी आहे.  6 ते 7 लाख मत जमा करायला वेळ लागणार नाही. त्यांच्याकडे चार-पाच कार्यकर्ते सोडले तर कुणीही नाही, असा टोला यावेळी भास्कर भगरे यांचे नाव न घेता जे पी गावितांना लगावला.

आणखी वाचा 

Nashik Loksabha : भुजबळांची नाशिक लोकसभेतून माघार, पण हेमंत गोडसेंना आता पक्षातूनच आव्हान, शिवसेनेत तयार झाले दोन गट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP MajhaAmit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीत

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
Embed widget