एक्स्प्लोर

Prakash Ambedkar : भाजपासोबत कधीही समझोता करणार नाही, तुमची लढाई लढण्यासाठी मला लोकसभेत पाठवा; प्रकाश आंबेडकरांचं जनतेला भावनिक आवाहन

Akola Lok Sabha Election 2024 : न्यायालय फक्त एवढच सांगू शकते की, हा कायदा संविधानिक आहे किंवा नाही, पण हा कायदा रद्द करायचा असेल, तर त्यासाठी कोणीतरी संसदेत जाऊन आवाज उठवणं गरजेचं आहे, असं आंबेडकरांनी म्हटलं आहे.

अकोला : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (RSS) आम्ही अंगावर घेऊ शकतो, त्यांना समजावून सांगू शकतो. रस्त्यावरील लढाई आम्ही जिंकू शकतो पण सभागृहातील लढाई जिंकायची असेल, तर सभागृहात जाणे गरजेचं आहे. तुमच्या मतांनी मी सभागृहात जाऊ शकतो आणि तुमची लढाई मी लढू शकतो, असं म्हणत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 'प्रेशर कुकर' या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन अकोल्यातील जनतेला केलं आहे. अकोल्यातील फतेह चौक येथील प्रचार सभेत ते बोलत होते. सभेला हजारोंच्या संखेने नागरिक उपस्थित होते.

प्रकाश आंबेडकरांकडून जनतेला भावनिक आवाहन

औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवून दंगलीचा माहोल आम्ही दोन ते तीन तासात संपवून टाकला, ही वस्तुस्थिती असल्याचेही आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. एक वेळ होती की, महाराष्ट्र या देशाला राजकारण आणि समाजाचा व्यवहार कसा असावा हे शिकवत होता. 1960 मध्ये यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी बाजार समितींचे गठण हे कायदेशीररीत्या केले. आणि त्यामध्ये म्हटले की, शेतकऱ्यांचा माल हा बाजार समितींमध्ये विकला गेला पाहिजे, असा इतिहासाचा दाखलाही आंबेडकर यांनी दिला.

संसदेत जाऊन आवाज उठवणे गरजेचं

आंबेडकर म्हणाले की, नागरिकत्वाच्या मुद्द्याला धरून जो NRC आणि CAA आला आहे. हा असंविधानिक आहे. संविधान म्हणते की, जो या देशात जन्माला आला तो भारतीय नागरिक आहे, त्याला कोणता पुरावा देण्याची गरज नाही. आता हे सरकार कागद मागत आहे. याचा अर्थ हा आहे की, तुमच्याकडे कागद आहेत, तर तुम्ही नागरिक आहात. तुमच्याकडे कागद नसेल, तर तुम्ही तुरुंगात जाल. ही लढाई बाहेरून लढली जाऊ शकत नाही, काही लोक म्हणतात की, आम्ही न्यायालयात जाणार. न्यायालय फक्त एवढच सांगू शकते की, हा कायदा संविधानिक आहे किंवा नाही, पण हा कायदा रद्द करायचा असेल, तर संसदच ते करू शकते, त्यासाठी कोणीतरी संसदेत जाऊन आवाज उठवणे गरजेचे आहे.

कधी भाजपासोबत समझोता करणार नाही

आज ज्यांच्या मनात भीती आहे, त्यांना मी काही महिन्यांपासून म्हणत आहे की, लोकांना आतून बदल पाहिजे आहे. 24 लाख हिंदू परिवार 2014 पासून नागरिकत्व सोडून स्थलांतरित झाले आहेत की, ज्यांची संपत्ती 50 करोडपेक्षा कमी नाही, या मुद्द्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. मी इथल्या पक्षांना म्हणत होतो की, आता एक नवीन चेहरा दाखवणे गरजेचे आहे. एकता दाखवणे गरजेचे आहे आणि एकता अशा संघटनांची दाखवणे गरजेचे आहे की, जी कधी भाजपासोबत समझोता करणार नाही, याचीही आठवण आंबेडकरांनी यावेळी करून दिली.

सरकारने जनतेची निराशा केली

लोक आशा लावून होते की, हे सरकार बदल घडवेल, पण त्यांची निराशा झाली आहे. ते मतदानाला जात नाहीत. याचा अर्थ असा आहे की, जे धर्मनिरपेक्ष नागरिक आहेत त्यांच्यावर जबाबदारी आहे की, त्यांनी 100 टक्के मतदान करावे, तेव्हा बदलाला सुरुवात होईल. आपण जर भाजपला मतदान दिलं, तर आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली असं होईल, असेही त्यांनी म्हटलं आहे.

धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिमांचे प्रश्न सोडवावेत

मुस्लिमांची लढाई ही NRC, CAA आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठीची आहे. मी आशा करत होतो की, काँग्रेस आमच्यासोबत समझोता करेल तो केला नाही, पण काँग्रेस पार्टी एवढं करू शकत होती की, काही जागा या मुस्लिमांना देईल, पण राजस्थान असो किंवा अन्य ठिकाणी काँग्रेस जागा देत नव्हती. मुस्लिमांच्या प्रश्नांना जोपर्यंत धर्मनिरपेक्ष पक्ष उचलत नाहीत, तोपर्यंत या देशात शांती राहणार नसल्याचे आंबेडकरांनी सांगितलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Ravindra Dhangekar On Pune Car Accindet Case :2 निलंबित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हायला हवी होतीAditya Thackeray On EVM Hacked : फसवणूक करणाऱ्यांना शपथ देणार का? ईव्हीएमवरून आरोप प्रत्यारोपSpecial Report Bangladeshi : मुंबईत नेमके किती बांगलादेशी? चालू वर्षात 177 बांगलादेशींना अटकTop 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
Embed widget