एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nashik News : 20 कोटींची गुंतवणूक, वर्षाला 30 हजार टन क्षमता, नाशिकच्या सह्याद्री फार्म्सने उभारला काजू प्रक्रिया प्रकल्प    

Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी असून काजू उत्पादनाचा मोबदला हवा तसा मिळणार आहे. स

नाशिक : नाशिकसह जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना (Cashew Nut Growers) दिलासा देणारी बातमी असून काजू उत्पादनाचा मोबदला हवा तसा मिळणार आहे. सह्याद्री फार्मर्स कंपनीच्या मोहाडी येथील सह्याद्री फार्म्स कॅम्पस मध्ये प्रतिदिन तब्बल 100 टन क्षमतेचा काजू प्रक्रिया प्रकल्प उभारला असून यामुळे आजूबाजूच्या तीनशेहून अधिक महिलांना कायमचा रोजगार मिळाला आहे. 

नाशिक (Nashik) जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा (Surgana), हर्सूल आदी भागात काजू पिकाचे उत्पादन घेतले जाते. येथील शेतकरी हे काजूचे उत्पादन घेत आजूबाजूच्या शहरात प्राथमिक प्रक्रिया करून विक्रीसाठी घेऊन जातात. मात्र अशावेळी व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना समाधानकारक मोबदला दिला जात नाही. मात्र आता शेतकऱ्यांना थेट मोबदला मिळणार असून या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सह्याद्री फार्म्सने काजू प्रक्रिया प्रकल्प उभारला असून काजू निर्मितीबरोबरच काजू कवचापासून तेल निर्मितीही सुरु करण्यात आली आहे. राज्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्टयातील भागाचे अर्थकारण उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे. 

सह्याद्री प्रोड्युसर (Sahyadri Company) कंपनीने कोकण व आदिवासी पट्ट्यातील महत्वाचे पिक असलेल्या काजूच्या मुल्यसाखळी उभारणीवरही भर देण्यास सुरवात केली आहे. या विषयी अधिक माहिती देतांना सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे Vilas Shinde) म्हणाले की, जगात काजू उत्पादनात भारत म्हणून आपण जगात आघाडीवर असलो तरीही देशांतर्गत असलेली काजूची मागणीही आपण पूर्ण करु शकत नाही. इतकी या शेतीत व व्यापारात वाढीला संधी आहे. महाराष्ट्रात कोकणाबरोबरच सह्याद्रीच्या पर्वतरांगातील घाटमाथ्यावरील इतरही भागात काजूमुळे आर्थिक क्रांती घडवण्याची संधी आहे. यातून केवळ काजू उत्पादक शेतकऱ्यांचेच उत्पन्न वाढणार नाही तर गावातच रोजगाराची संधी निर्माण झाल्यामुळे रोजगारासाठी शहरात गेलेला तरुणवर्ग पुन्हा गावांत स्थिरावणार आहे.

300 हून अधिक महिलांना कायमस्वरुपी रोजगार

‘सह्याद्री’चा काजू प्रक्रिया प्रकल्प असून प्रति दिनी 100 टन कच्चे काजू हाताळणीची क्षमता आहे. देशातील टॉप 10 मधील आणि राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प असल्याचे कंपनीकडून सांगण्यात येत आहे. प्रक्रियेची सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी असून काजू कवचापासून तेल काढणीचा 20 टन क्षमतेचा प्लॅन्ट उभारण्यात आला आहे. उत्पादन गुणवत्तेच्या बीआरसी उच्च मानकांच्या समकक्ष व्यवस्थापन करण्यात आले आहे. या काजू प्रक्रिया प्रकल्पामुळे परिसरातील 300 हून अधिक महिलांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे. 

काजूची प्रक्रिया कशी आहे?

सामान्यतः कच्च्या काजूच्या, खाद्य काजूच्या दाण्यामध्ये प्रक्रिया करण्यासाठी पारंपारिक पद्धतीने भाजणे, वाळवणे, सोलणे, ग्रेडिंग, गुणवत्ता नियंत्रण, धुणी आणि पॅकेजिंग, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या दर्जाचे कर्नल मिळविण्यासाठी या सर्व पायऱ्या काळजीपूर्वक पार पाडाव्या लागतात. कच्च्या काजूवर दोन प्रकारची प्रक्रिया असते. त्याला उकळवून घेतले जाते. थंड केले जाते, त्याला फोडले जाते, बी वेगळी केली जाते. आधीच्या टप्प्यातील काजू तयार होतो. दुसऱ्या टप्प्यात लेयर काढली जाते. ग्रेडिंग केली जाते. साईजनुसार, कलारनुसार, ए ग्रेड बी ग्रेड नुसार वेगळं केला जातो... सालटे काढली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik Sahyadri Farms : सह्याद्री फार्म्सकडून कर्मचाऱ्यांंसाठी खूशखबर! 461 कर्मचाऱ्यांना 70 कोटीचे शेअर्स 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget