एक्स्प्लोर

Nashik Sahyadri Farms : सह्याद्री फार्म्सकडून कर्मचाऱ्यांंसाठी खूशखबर! 461 कर्मचाऱ्यांना 70 कोटीचे शेअर्स 

Nashik Sahyadri Farms : नाशिक (Nashik) शहराजवळील मोहाडी (Mohadi) येथील प्रसिद्ध सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

Nashik Sahyadri Farms : नाशिक (Nashik) शहराजवळील मोहाडी (Mohadi) येथील प्रसिद्ध सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सह्याद्री फार्म्समधील कर्मचाऱ्यांसाठी एम्पलॉयी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ईसॉप) योजना लागू करण्यात आली असून त्यानुसार कर्मचाऱ्यांना 70 कोटीचे समभाग (शेअर्स) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 70  कोटी रुपयांच्या कंपनीच्या एकूण देयकाच्या चार टक्के समभाग या योजनेला संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. 

नाशिकच्या दिंडोरी (Dindori) तालुक्यात मोहाडीजवळ सह्याद्री फार्म्स कंपनी (Sahyadri Farms) असून पीक लागवडी पासून ते ग्राहकांच्या ताटापर्यंत अन्न पोहोचवणारी शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. अल्पभूधारक आणि छोट्या शेतकऱ्यांच्या मालकीची एकात्मिक मुल्यसाखळी म्हणून 'सह्याद्री फार्म्स'ला ओळखले जाते. दरम्यान, सद्यस्थितीत मोठमोठ्या कार्पोरेट कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांसाठी इसॉप  योजना लागू करत असतात. मात्र हे पाऊल आता सह्याद्री फार्म्सने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी उचलले असून अशा पद्धतीने सह्याद्री फार्म्स ही ग्रामीण भारतात इसॉप योजनेची घोषणा करणारी पहिली संस्था आहे. या योजनेत 'सह्याद्री फार्म्स'च्या वाढीसाठी मूल्य निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.  

‘सह्याद्री फार्म्स‘ ही संस्था आपल्या सर्व भागधारकांसाठी, प्रामुख्याने शेतकरी भागधारकांसह ग्राहक (Shares to employees) आणि कर्मचारी यांच्यासाठी मूल्य निर्माण करत आहे.  अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा आणि श्रमाचा योग्य मोबदला मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या सह्याद्री फार्म्सने कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याच्या दृष्टीने ही योजना एक भाग आहे. ‘सह्याद्री फार्म्स’च्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली.” असे सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी सांगितले. 

सह्याद्री फार्म्स येथे काम करणारे जनार्दन उन्हवणे म्हणाले कि, गेली अनेक वर्षे सह्याद्री फार्म्समध्ये काम करीत आहे. अगदी सुरवातीपासून या संस्थेच्या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. संस्था आता प्रगतीच्या टप्प्यावर असताना व्यवस्थापनाने आमच्याही संपत्ती निर्माणाचा विचार करून आम्हाला समभाग देण्याचा एतिहासीक निर्णय घेतला.यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. मात्र त्याचवेळी आम्हा अधिक जबाबदारीने, आपलेपणाने कष्ट करण्यास आम्हाला अधिक बळ येणार आहे. 

कर्मचाऱ्यांचा चार टक्के समभाग 

इसॉप योजनेत समाविष्ट कर्मचार्यांची एकूण संख्या 461 आहे तर तिचा निहित कालावधी चार वर्षांचा आहे. यात कंपनीतील सर्व स्तरावरील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या हिताचा विचार करता  ही एक अनोखी योजना आहे ज्यामध्ये पदानुक्रमाचे निकष न ठेवता सर्वांना लाभ मिळेल. या योजनेसाठी इतर अनेक कंपन्या प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती आणि वरिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांवरच लक्ष केंद्रित करत असताना सह्याद्री फार्म्सने मात्र आपल्या सर्व कर्मचाऱ्यांचा या योजनेत समावेश केला आहे. यामुळे कंपनी आणि कर्मचाऱ्यांतील बंध अधिक मजबूत होतील. कामाची उत्पादकता वाढण्याबरोबरच थेट आर्थिक पाठबळ मिळण्यासाठीही याचा उपयोग होणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
Nashik Crime News: त्र्यंबक रोडवरील रिसॉर्टमध्ये रंगायच्या पार्ट्या, आरोपी तिथेच ओढायचे मुलींना जाळ्यात, नाशिक धर्मांतर प्रकरणात SIT च्या हाती महत्त्वाचा धागा
त्र्यंबक रोडवरील रिसॉर्टमध्ये रंगायच्या पार्ट्या, आरोपी तिथेच ओढायचे मुलींना जाळ्यात, नाशिक धर्मांतर प्रकरणात SIT च्या हाती महत्त्वाचा धागा

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : सरपंच श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनच्या साथीनं हार्दिक पांड्याचा करेक्ट कार्यक्रम, रोहित-सूर्या पाहत राहिले, पाहा व्हिडिओ
श्रेयस अय्यरची सीमारेषेवर अफलातून उडी, यानसेनची अचूक साथ, रोहित-सूर्या पाहत राहिले
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Embed widget