Nashik News : ना मोबाईल, ना परफ्युम बॉटलचा स्फोट! नाशिकच्या सिडको येथील स्फ़ोटामागील धक्कादायक कारण समोर
Nashik News : नाशिकच्या (Nashik) उत्तमनगर परिसरात गेल्या आठवड्यात बुधवारी तुळजा निवास या एका घरात झालेल्या स्फोटाच्या (Blast) घटनेमुळे खळबळ उडाली होती.
नाशिक : आज प्रत्येकाच्या घरात गॅस शेगडी (Gas Cylinder) असून घरातील स्वयंपाकासाठी महत्त्वाचे काम गॅस शेगडी करत असते. मात्र याच गॅसकडे जर दुर्लक्ष अथवा एका चुकीमुळे होत्याचे नव्हते होण्याची शक्यता असते. काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) शहरातील सिडको परिसरात झालेल्या भीषण स्फोटाचे कारण समोर आले असून यात गॅस लिकेज (Gas Leakage) झाल्याने हा स्फोट झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नाशिकच्या (Nashik) उत्तमनगर परिसरात गेल्या आठवड्यात बुधवारी तुळजा निवास या एका घरात झालेल्या स्फोटाच्या (Blast) घटनेमुळे खळबळ उडाली होती. या घटनेत घरातील दोन पुरुष आणि एक महिला गंभीररित्या भाजले होते. विशेष म्हणजे हा स्फोट इतका भीषण होता की सिलेंडरच्या स्फोटासारखा आवाज होऊन परिसर हादरून गेला होता. स्थानिक नागरिक यामुळे भयभीत झाले होते. स्फोट झालेल्या घराबाहेर काही अंतरावरील दोन चारचाकी वाहनांच्याही काचा फुटल्या होत्या तर घरात दोन मोबाईल (Mobile), परफ्युम बॉटल आणि ईतर कॉस्मेटिक साहित्य त्यांना जळालेल्या अवस्थेत आढळून आले होते. मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट झाला असावा किंवा अल्कोहोलिक परफ्युमला आग लागल्याने ती भडकली असावी अशी परिसरात जोरदार चर्चा रंगली होती.
दरम्यान ही आग नक्की कशामुळे लागली? या घटनेमागे काही दुसरे कारण तर नाही ना? याचा शोध अंबड पोलिसांकडून (Ambad Police) सुरु असतानाच जखमी महिलेने दिलेला जबाब आणि फॉरेन्सिक रिपोर्टच्या अहवालानूसार गॅस लिकेजमुळे ही आग लागल्याचं समोर आल आहे. संबंधित महिला सकाळी गॅसवर पाणी गरम करण्यासाठी गेली असता तिने गॅस शेगडीचे बटन सुरु करत लायटरने गॅस पेटवण्याचा प्रयत्न सुरु केला होता, मात्र लायटर बंद पडल्याने त्यांनी काडेपेटीचा बॉक्स शोधला. यात बराच वेळा गेल्याने गॅसची मोठ्या प्रमाणावर गळती झाली होती, मात्र ही बाब त्यांच्या लक्षात आली नव्हती आणि अखेर त्यांनी काडेपेटी पेटवताच ही आग भडकली होती.
काय घटना घडली होती?
नाशिक शहरातील उत्तमनगर परिसरात तुळजा निवास या घरात गांगुर्डे कुटुंबीय वास्तव्यास आहे. सकाळच्या नेहमीप्रमाणे घरातल्या कुटुंबीयांची लगबग सुरु होती. यावेळी अचानक स्फोट झाला. सदर स्फोट इतका गंभीर होता की, त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली, काचा फुटल्या. तसेच शेजारच्या घराच्या काचा फुटल्या असून समोरच्या भागातील दोन गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झाल्याचे नागरिक सांगत आहेत. घरात दोन मोबाईल जळालेल्या अवस्थेत दिसून आले, तसेच परफ्युमच्या बॉटल आणि इतर काही साहित्य घराबाहेर फेकलं गेलं होते, त्यावेळी मोबाईलचा स्फोट झाल्याचा चर्चा रंगल्या होत्या. मात्र पोलिसांच्या तपासानंतर नेमकं कारण समोर आले आहे. गॅस शेगडी चालू करून बराच वेळानंतर जेव्हा प्रत्यक्ष शेगडी पेटवली तेव्हा भडका उडून स्फोट झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर महत्त्वाची बातमी :