Nashik News : नाशिकच्या सिडको परिसरातील घरात भीषण स्फोट, घराच्या काचा फुटल्या, तीन जण जखमी, काय घडलं नेमकं?
Nashik Blast : नाशिक (Nashik) शहरात धक्कादायक घटना घडली असून सिडको परिसरातील एका घरात भीषण स्फोट (Blast) झाल्याचा प्रकार घडला आहे.
नाशिक : नाशिक (Nashik) शहरात धक्कादायक घटना घडली असून सिडको परिसरातील एका घरात भीषण स्फोट (Blast) झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत घरातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले असून घराच्या काचा देखील फुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा स्फोट घरात वापरल्या जाणाऱ्या डिओड्रंटमुळे (Deodorant) झाल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. मात्र पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा तपास सुरु आहे तर जखमींना नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आपल्या घरात अशा अनेक वस्तू असतात, ज्यामुळे अनेकदा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. यात मोबाईल (Mobile), गॅस सिलेंडर (Gas Cylinder), गिझर (Gizer) त्याचबरोबर डिओड्रंट हा सुद्धा कुटुंबियांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. याचाच प्रत्यय नाशिकमधील एका कुटुंबियांना आला आहे. घरात वापरला जाणारा डिओड्रंट नाशिकमधील एका कुटुंबियांसाठी काळ बनून आला होता, मात्र सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सिडको (Cidco) भागातील उत्तमनगर परिसरात राहणाऱ्या गांगुर्डे यांच्या घरात ही भीषण स्फोटाची (Mobile Blast) घटना घडली आहे. आज सकाळच्या सुमारास घरात लगबग सुरु असताना अचानक डिओड्रंटचा स्फोट झाल्याने घरातील तीन सदस्य जखमी झाले. शिवाय घराच्या काचांसह आजूबाजूला असलेल्या वाहनांच्या काचा देखील फुटल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
दरम्यान उत्तमनगर परिसरात तुळजा निवास या घरात गांगुर्डे कुटुंबीय वास्तव्यास आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे घरातल्या कुटुंबीयांची लगबग सुरु होती. याचवेळी घरात मोबाईल चार्जिंगला लावलेला होता. याच मोबाईलच्या बाजूला डिओड्रंट आणि काही कॉस्मेटिक ठेवण्यात आले होते. त्यामुळे मोबाईलच्या उष्णतेने डिओड्रंटचा मोठा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. सदर स्फोट इतका गंभीर होता की, त्यामुळे संपूर्ण घराला आग लागली, काचा फुटल्या. तसेच शेजारच्या घराच्या काचा फुटल्या असून समोरच्या भागातील दोन गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झाल्याचे नागरिक सांगत आहेत. दरम्यान घरात दोन मोबाईल जळालेल्या अवस्थेत आहेत, मात्र चार्जिंग सॉकेट जळालेले नाहीत. परफ्युमच्या बॉटल आणि इतर काही साहित्य घराबाहेर फेकलं गेलं आहेत, पण त्यांना आगीचा फटका बसलेला नाही. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सिलेंडरचा स्फोट झाल्यासारखा आवाज झाल्याने आम्ही घाबरलो आणि घराबाहेर पळत सुटलो, घरात आग लागल्याने आम्ही पाणी टाकून ती विझवली. पोलिसांचा तपास सुरु असून या तपासानंतरच स्फोटाचे नेमके कारण समोर येणार आहे.
घरासह वाहनाच्या काचाही फुटल्या....
नाशिक शहरातील सिडको भागातील उत्तमनगर येथे सकाळी सहा वाजेच्या सुमारास एका घरात मोबाईलचा स्फोट होऊन कुटुंबातील तीन जण जखमी झाले आहेत. त्यात एकाची तब्येत गंभीर असून जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या स्फोटामुळे मोठी आग भडकून घराचे नुकसान झाले. घरातील काही साहित्य जळून खाक झाले. स्फोटाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळे घराबाहेरील गाड्यांच्या काचा फुटल्या, आजूबाजूच्या घरांच्या काचा फुटल्या. त्यामुळे परिसरात काहीशी घबराट देखील पसरली. या घटनेतील तुषार जगताप, शोभा जगताप, बाळकृष्ण सुतार असे जखमी झालेल्यांची नावे असल्याची प्राथमिक माहिती आहे.
इतर महत्वाची बातमी :