Nashik News : नाशिकच्या जवानाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, चांदवड तालुक्यावर शोककळा
Nashik News : नाशिकच्या (Nashik) चांदवड तालुक्यातील (Chandwad Taluka) कळमदरे गावचे भूमिपुत्र अर्जुन तुकाराम गांगुर्डे यांचे कर्तव्य बजावत असताना निधन झाले.
Nashik News : ओडिशा (Odisa) राज्यातील राऊर्केला येथील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेले चांदवड तालुक्यातील कळमदरे गावचे भूमिपुत्र अर्जुन तुकाराम गांगुर्डे यांचे गुरुवारी कर्तव्य बजावत असताना निधन झाले. या घटनेची माहिती मिळताच समस्त गावकरी वर्गावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान अर्जुन यांचा मृतदेह आज शनिवारी सायंकाळपर्यंत चांदवडला पोहोचणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या वीर जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. चांदवड तालुक्यातील कळमदरे येथील शेतकरी कुटुंबात अर्जुन गांगुर्डे यांचा जन्म झाला लहानपणापासूनच अर्जुन यांना देशसेवा करण्याची आवड होती. त्यानुसार त्यांनी 1991 मध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती झाले. तेव्हापासून ते आजतागायत अर्जुन गांगुर्डे यांनी कर्तव्य बजावले.
तसेच ते सध्या कुंटुबासह नाशिक येथे वास्तवयास होते. ते ओडीशा येथील राऊर्केला येथे आपले कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्याचे पार्थिव मुळगाव चांदवड तालुक्यातील कळमदरे आज शनिवार रोजी सायंकाळ पर्यंत येणार असुन या ठिकाणी शासकिय इतमामांत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मृत्युची बातमी कळताच गावात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. जवान अर्जुन गांगुर्डे यांच्या पश्चात आई वत्सलाबाई, वडील तुकाराम, पत्नी पुष्पा, मुलगा रोहन, मुलगी शिवानी असा परिवार आहे.
चांदवड तालुक्यातील कळमदरे येथील भारतीय सेनेत (CISF) चे जवान अर्जुन तुकाराम गांगुर्डे (51) हे ओडिशात कर्तव्य बजावता असताना त्यांना हदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. अर्जुन गांगुर्डे हे 1991 साली भारतीय सैनदलातील CISF विभागात भरती झाले होते. ते सध्या हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. त्यांचा मुलगा रोहन गांगुर्डे यांची काही दिवसापुर्वी नुकतीच सैन्य दलाच्या लेप्टनन्ट पदावर नियुक्ती झाली.
अर्जुन गांगुर्डे हे आपल्या कुटूंबातील एकुलते एक मुलगा सैन्य दलात होता. सिक्कीम येथील कार्यलयात अधिकारीपदावर कार्यरत होते. हेड कॉन्स्टेबल गांगुर्डे यांच्या निधनाची बातमी आल्यानंतर कुटुंबियांसोबत तालुक्यावर शोककळा पसरली आहे. एक महिन्यापूर्वीच ते गावी सुट्टीवर आले होते. त्यावेळी त्यांनी विविध विवाह सोहळ्यांनाही हजेरी लावली होती. पण त्यांना अचानक वीरगती प्राप्त झाल्याने स्वतःच्या मुलाचा विवाह सोहळा अनुभवता आला नसल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासकीय इतमामांत अंत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत.