Nashik ZP Election : नाशिक जिल्हा परिषद व पंचायत समितीची आरक्षण सोडत 13 जुलै रोजी, असा असेल सोडत कार्यक्रम...!
Nashik ZP Election : नाशिक (Nashik) जिल्हा परिषदेच्या (Nashik ZP) 84 गट आणि पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) 108 जणांच्या आरक्षण (Reservation) सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे.
Nashik ZP Election : राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) निर्देशानुसार येत्या 13 जुलै रोजी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील पंचायत समिती (Panchayat Samiti) व जिल्हा परिषदेची (Zilha Parishad) आरक्षण सोडत काढली जाणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या 84 गट आणि पंचायत समितीच्या 108 गणांच्या आरक्षण सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे.
दरम्यान राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 25 जिल्हा परिषदेच्या गटांच्या आणि 284 पंचायत समितीच्या गणांच्या आरक्षण सोडतेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यानुसार येत्या 13 जुलैला आरक्षण सोडत काढण्याचा आदेश निवडणूक आयोगाने ज्या जिल्ह्यांमध्ये निवडणुका होणार आहे. त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. जिल्हा परिषद आरक्षण सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात तर पंचायत समितीचे आरक्षण संबंधित तालुक्याच्या ठिकाणी जाहीर केले जाणार आहे.
दरम्यान राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता आहे नाशिक नाशिक जिल्हा परिषदेच्या 84 गट आणि पंचायत समितीच्या 168 गाण्यांच्या आरक्षण सोडत 13 जुलै रोजी काढण्यात येणार आहे त्याचप्रमाणे 15 जुलै ते 21 जुलै दरम्यान आरक्षणावर हरकती व सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर 25 जुलै रोजी आलेल्या हरकती व सूचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवल्या जातील. त्यानंतर 29 जुलै रोजी प्राप्त हरकती व सूचनांवरील जिल्हाधिकाऱ्यांचे अभिप्राय विचारात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडून आरक्षण मान्यता दिली जाईल. तसेच 02 ऑगस्ट रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.
ओबीसी आरक्षणाचा प्रश्न
इतर मागास प्रवर्गाच्या म्हणजेच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे न्यायालयाच्या आदेशानुसार जोपर्यंत राज्य शासन त्री सदस्य चाचणी पूर्ण करीत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांना मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागा राखून ठेवता येणार नाही त्यामुळे ओबीसी वगळता महिला आरक्षण निश्चित करण्यासाठी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे आयोगाच्या आदेशानुसार दिनांक सात जुलै रोजी अनुसूचित जाती महिला अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिलांच्या करता आरक्षण सोडत काढण्याची सूचना प्रसिद्ध केली जाणार आहे.
असा असेल सोडत कार्यक्रम...
गण आणि गटाची आरक्षणाची सोडत : 13 जुलै.
आरक्षणाची प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध करणे : 15 जुलै.
हरकती व सूचना सादर करणे : 15 ते 21 जुलै.
हरकती व सूचना अभिप्रायासह आयोगाकडे सादर करणे : 25 जुलै.
हरकती व सूचना नंतर आरक्षणास मान्यता देणे : 29 जुलै.
आरक्षण अंतिम करणे : 02 ऑगस्ट.