एक्स्प्लोर

Dindori Loksabha : मी कागदावर चॅलेंज स्वीकारायला तयार! भास्कर भगरेंनी केलेल्या आरोपांवर भारती पवारांचं उत्तर

Dr Bharti Pawar vs Bhaskar Bhagare : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असूनही भारती पवारांनी मतदारसंघातील आरोग्याचे प्रश्न सुटले नाहीत, कांदा प्रश्नावर त्या तोडगा काढू शकल्या नाहीत, असा आरोप भास्कर भगरेंनी केला.

Dindori Lok Sabha Constituency : नाशिकच्या दिंडोरीमध्ये सध्या राजकारण चांगलंच तापल्याच बघायला मिळतय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी घोषित होताच भास्कर भगरे (Bhaskar Bhagare) आक्रमक झाले असून धनशक्तीला सर्वसामान्य जनता पराभूत करेल, असे म्हणत त्यांनी भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलय. यासोबतच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असून देखील मतदारसंघातील आरोग्याचे प्रश्न सुटले नाहीत, कांदा प्रश्नावर त्या तोडगा काढू शकल्या नाहीत, असा आरोप भास्कर भगरेंनी केलाय.

भास्कर भगरे यांच्या आरोपाला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणून जेवढा निधी मागच्या ७० वर्षात आला नसेल तेवढा माझ्या कार्यकाळात मी आणला असून कागदावर चॅलेंज स्वीकारायला मी तयार आहे, असं भारती पवारांनी म्हटलंय. यासोबतच उमेदवारी जाहीर होताच त्यांनीच धनशक्ती जमा करायला सुरुवात केल्याचाही पलटवार पवार यांनी भगरेंवर केला आहे. आधीच्या सरकारने आणि आताचे सरकारने कांदा प्रश्नावर काय काय केले ते बघा, कांद्याबाबत फक्त राजकारण करू नका या शब्दात त्यांनी भास्कर भगरेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.    

आमची लढाई विकासाच्या मुद्द्यावर

डॉ. भारती पवार म्हणाल्या की, आमची लढाई विकासाच्या मुद्द्यावर आहे. धनशक्ती ते म्हणतात मात्र मी ऐकले की उमेदवारी जाहीर होताच त्यांनीच धनशक्ती जमा करायला सुरुवात केली आहे. जनतेत जाऊन विकासाच्या मुद्द्यावर लोकशाही मार्गाने ही निवडणूक आपण लढली पाहिजे. धनशक्ती उल्लेख करण्यापेक्षा जनतेच्या अकाउंटमध्ये जनधन योजनेच्या माध्यमातून पंतप्रधानांनी किती निधी दिला हे देखिल बघणं महत्वाचं आहे. मोदीजींवर देशाचा आणि माझ्या मतदारसंघाचा विश्वास आहे. 

मी कागदावर चॅलेंज स्वीकारायला तयार

आरोग्यमंत्री म्हणून जेवढा निधी मागच्या ७० वर्षात आला नसेल तेवढा माझ्या कार्यकाळात आणला, मी कागदावर चॅलेंज स्वीकारायला तयार आहे. आरोप करण्यापेक्षा तथ्यांवर बोला, ही लढाई टिकेवर बोलण्याची नाही. तथ्यांवर, रिपोर्टवर, डेटावर बोलण्याची लढाई आहे. आम्ही आमचा रिपोर्ट कार्ड घेऊन जनतेसमोर जातो आहोत. माझ्या जिल्ह्याला आरोग्य सुविधा बळकट करण्याचे काम आम्ही केले आहे.  भगरेंनी हा रिव्ह्यू बघितला नसावा, नुसता आरोप करू नये, असे त्यांनी म्हटले आहे. 

कांद्याला अनुदान देणारं पहिलं सरकार

मी खासदार झाल्या झाल्या कांद्याची निर्यातबंदी खुली केली होती. कांद्याचा भाव कमी झाला की, मी देखील वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत, त्या माध्यमातून नाफेडची खरेदी सुरु केली. आधीच्या सरकारनेच निर्यातबंदी केली होती, त्यावर पण बोलले पाहिजे. आधीच्या सरकारने आणि आताचे सरकारने केलेलं काम बघितले पाहिजे त्यांनी उत्तर दिले पाहिजे. आमच्या राज्य सरकारने कांद्याला अनुदान दिले, हे पहिले सरकार होते. ७० वर्षात कोणीही हा निर्णय का घेतला नाही? कांद्याबाबत फक्त राजकारण करू नये, आम्ही राजकारण नाही समाजकारण करतोय, शेतकऱ्यांशी बांधीलकी असलेली मी कन्या आहे. मी पण शेतकरी घराण्यातीलच आहे. निर्यात खुली करा हे मी पण म्हणते. काही देशात निर्यात खुली करण्यात आली आहे. आम्ही प्रयत्न करतोय, असे त्यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Dindori Loksabha : अखेर शरद पवारांनी डाव टाकलाच, दिंडोरीत भारती पवारांविरोधात भास्कर भगरेंना उमेदवारी जाहीर!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
अशोक खरातच्या फरार पत्नीच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली; कोर्टाकडून नवी तारीख, नेमकं काय घडलं?
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
उष्णतेच्या तीव्रतेत जास्त काम करणे टाळा, 12 ते 4 उन्हात जाणे टाळा; गिरीश महाजनांचे नागरिकांना आवाहन
Nashik Crime News: त्र्यंबक रोडवरील रिसॉर्टमध्ये रंगायच्या पार्ट्या, आरोपी तिथेच ओढायचे मुलींना जाळ्यात, नाशिक धर्मांतर प्रकरणात SIT च्या हाती महत्त्वाचा धागा
त्र्यंबक रोडवरील रिसॉर्टमध्ये रंगायच्या पार्ट्या, आरोपी तिथेच ओढायचे मुलींना जाळ्यात, नाशिक धर्मांतर प्रकरणात SIT च्या हाती महत्त्वाचा धागा

व्हिडीओ

Animal Parlor : साताऱ्यातील पाटणमध्ये जनावरांचं ब्युटी पार्लर Special Report
Women Reservation : महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने Special Report
Nashik TCS : नाशिकच्या टीसीएसप्रकरणी रिसॉर्टवर कारवाई, कारागृहात धुलाई Special Report
Ayan Ahmad Amravati : रील स्टार अयान अहमद कसा बनला गुन्हेगार? Special Report
Bhondu Baba : मुंबईच्या मालाडमधील भोंदूबाबाचा पर्दाफाश Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इस्त्रायल-लेबनॉनच्या शस्त्रसंधीची घोषणा, दोन्ही देशांचे नेते 34 वर्षानंतर भेटले
ट्रम्प यांच्याकडून आणखी एका युद्धाच्या शस्त्रसंधीची घोषणा, इस्त्रायल-लेबनॉन संघर्षाला 10 दिवस ब्रेक
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
धक्कादायक! नाशिकमध्ये विजेचा धक्का लागून दोन शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू, वीजपंप दुरुस्ती करताना घडली घटना
MI vs PBKS : वानखेडेवर पंजाबच्या प्रभसिमरन आणि श्रेयस अय्यरचं वादळ,  पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर
पंजाबचा 7 विकेटनं मुंबईवर दणदणीत विजय, गुणतालिकेत टॉपवर,वानखेडेवर प्रभसिमरन आणि श्रेयसचं वादळ
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
जपानी मेंदूज्वराविरोधात महाराष्ट्र सतर्क; लसीकरण मोहिमेला वेग, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली माहिती
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
शासकीय कर्मचाऱ्यांना गुडन्यूज; 7 व्या वेतनगटानुसार सरकारी घरं मिळणार, सा. बांधकाम विभाग चटईक्षेत्र वाढवणार
Suryakumar Yadav : रोहित दुखापतीमुळं संघाबाहेर सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद, अर्शदीप सिंगचा धमाका
सूर्यकुमार यादवचा खराब फॉर्म कायम, पहिल्याच बॉलवर बाद,अर्शदीप सिंगचा धमाका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 एप्रिल 2026 | गुरुवार
Priyanka Gandhi : 543 मध्येच 33 टक्के आरक्षण का देत नाही, आजचं मंजूर होईल, शुभ काम होईल, काळा टिळा कामात येईल : प्रियांका गांधी
आज जर चाणक्य जिवंत असते तर तुमची राजकीय कुटिलता पाहून आश्चर्यचकित झाले असते, प्रियांका गांधींचा टोला
Embed widget