एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Valentine's Day Special- सिया-महेशच्या निस्वार्थ प्रेमाची कहाणी

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमचं सेम असतं' हे जरी मंगेश पाडगावकर म्हणत असले तरी सिया आणि महेशचा प्रेम जरा हटके आहे.

मुंबई : आज व्हॅलेंटाईन डे आहे. या प्रेमाच्या अनोख्या मुहूर्तावर आपल्या प्रेमाप्रती आदरभाव तसंच उत्कट प्रेम व्यक्त करण्याचा हा दिवस. अशीच एक प्रेम कहाणी आहे ज्यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे. ही प्रेम कहाणी आहे मुंबईची बर्न विक्टिम सिया पारकर आणि उत्तर प्रदेशाच्या महेश शर्माची. प्रेम म्हणजे नेमकं काय ? याचा खरा अर्थ या दोघांनी समाजाला दाखवून दिला आहे. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आमचं सेम असतं' हे जरी मंगेश पाडगावकर म्हणत असले तरी सिया आणि महेशचा प्रेम जरा हटके आहे. सिया नववी मध्ये शिकत असताना कौटूंबिक भांडणात तिचा चेहरा आणि शरीराचा भाग जळाला आणि बर्न विक्टिम झालेली सिया काही वर्ष डिप्रेशनमध्ये गेली. मात्र, आयुष्यात हार न मानता तिने पुढे पदवी शिक्षण पूर्ण करत आता ती निराधार महिलांसाठी कार्य करते. स्वतः वर प्रेम करायला शिकलेल्या सियावर उत्तर प्रदेशच्या महेशचा प्रेम बसलं आणि थेट त्याने लग्नाची मागणी सियाला घातली. महेश सुद्धा उत्तरप्रदेशमध्ये एनजीओमध्ये काम करतो. त्यामुळे सियाच दुःख त्याने समजून तिला आपला आधार देण्यास सुरुवात केली. इतकाच नाही तर तिच्या वेदना आपण वाटून घेऊन तिला आयुष्यभर सुखी ठेवण्याचं आणि सियाची काळजी घेण्याचं वचन महेशने सियाला दिलं आहे. लवकरच हे दोघे आता विवाहबंधनात अडकणार असून आपलं नवं आयुष्य सुरू करत आहे. 'प्रेम हे शरीर ,सौंदर्य याच्या पलीकडच आहे. हे प्रेम मनाच मनाशी जुळलेलं कोणताही स्वार्थ नसलेलं आहे', अस महेश आणि सियाच म्हणणं आहे. त्यामुळे हे प्रेम समाजासाठी एक उदाहण बनून निस्वार्थ प्रेमाची व्याख्या सांगत आहे. Valentine Day | प्रेम कुणावर करावं... सांगणारी प्रेमयात्रा!, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपक्रम | ABP Majha संबंधित बातम्या :  'व्हॅलेंटाईन डे' बाबतच्या प्रश्नावर आदित्य ठाकरे लाजतात तेव्हा...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar Delhi : अजित पवारांच्या दिल्लीवारीमुळे भुवया उंचावल्याMarkadwadi Protest : व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचं मत भाजपकडे वळत असल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
ईव्हीएमच्या व्हीव्हीपॅटमध्ये तुतारीचे मत भाजपला, उत्तम जानकरांचा गंभीर आक्षेप; नेमकं काय म्हणाले?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
देशातील बड्या नेत्याला बाथरुम स्वच्छ करण्याची शिक्षा; खरकटी भांडीही घासावी लागणार, काय आहे प्रकरण?
Ajit Pawar: अजित पवारांवर दिल्लीत तिष्ठत बसण्याची वेळ, अमित शाहांची भेट मिळालीच नाही, वेगळ्याच चर्चांना उधाण
अजित पवार करायला गेले एक अन् झालं भलतंच, अमित शाह नाराज? दिल्लीत जाऊन भेट मिळालीच नाही
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला
Embed widget