एक्स्प्लोर
सचिन आणि लतादीदींवर एआयबीच्या तन्मय भट्टकडून अश्लाघ्य टिप्पणी

मुंबई : एआयबी रोस्टच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या कॉमेडियन्सपैकी तन्मय भट्ट याने अकलेचे तारे तोडले आहेत. नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमधून तन्मयने भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिप्पणी केली आहे.
विराट कोहली हा सचिनपेक्षा दसपटीने महान क्रिकेटर असल्याच्या विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडत सचिन आणि लता मंगेशकर यांच्या दरम्यानच्या काल्पनिक संवादातून आक्षेपार्ह शेरेबाजी करण्यात आली आहे.
खरं तर ज्यांच्यावर शेरेबाजी करण्यात आली, ते दोघेही भारतरत्न आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात खालच्या पातळीवर केलेल्या कोट्यांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होतो आहे.
तन्मय भट्टला रस्त्यावर उतरुन दाखवावं, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. शिवाय, मनसेने तन्मय भट्टविरोधात पोलिसांत तक्रारही दिली आहे.
अभिनेते अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवरून दिली आहे. तर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही हा प्रकार निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
https://twitter.com/AnupamPkher/status/736770785713356800
https://twitter.com/AUThackeray/status/736619009228079104
याआधीही मुंबईत आयोजित केलेलया एका शोवर अश्लीलता पसरवल्याच्या आरोपातून तन्मय भट्टसह अनेक सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पाहा व्हिडीओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
