(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai University :एलएलबीची सहाव्या सत्राची परीक्षा तोंडावर तरी परीक्षेचे अर्ज भरून घेतले नाहीत, मुंबई विद्यापीठाचा ढिसाळ कारभार कायम
Mumbai University Examination : अवघ्या बारा दिवसांवर परीक्षा असताना अद्यापही परीक्षा देणाऱ्या अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले नाहीत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाचा (Mumbai University) ढिसाळ कारभार पुन्हा समोर आला आहे. मुंबई विद्यापीठाअंतर्गत एलएलबी सत्र सहाच्या परीक्षा ३ मे पासून घेण्यात येणार आहेत. परीक्षेला अवघे 12 दिवस राहिले असतानाही अजून मुंबई विद्यापीठाने परीक्षेचे अर्जच भरून घेतले नाहीत. अर्ज भरुन घेण्यापूर्वीचं विद्यापीठानं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलंय. त्यामुळे विद्यार्थी पुन्हा एकदा गोंधळात सापडले आहेत.
मुंबई विद्यापीठ एलएलबी सत्र सहाच्या परीक्षा या 3 मे पासून मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांमध्ये घेतल्या जाणार आहेत. मात्र अवघ्या बारा दिवसांवर परीक्षा असताना अद्यापही परीक्षा देणाऱ्या अनेक महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरलेले नाहीत. शिवाय परीक्षा अगदी तोंडावर असताना हॉल तिकीट सुद्धा विद्यार्थ्यांना दिले गेले नाहीत. मात्र, दुसरीकडे या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. आता विद्यार्थ्यांचे अर्ज कधी भरून घेतले जाणार आणि हॉल तिकीट कधी मिळणार असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. दरम्यान, पाचव्या सेमिस्टरचा निकाल सुद्धा काही विद्यार्थ्यांना न मिळाल्याने सहाव्या सेमिस्टरची परीक्षा तातडीने घेऊ नये अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे पाचव्या सेमिस्टर विषय बॅक आहेत त्या परीक्षा द्यायची का पुनर्मुल्यांकनाचा अर्ज भरून निकालाची वाट पाहायची ?हा सुद्धा मोठा संभ्रम विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे
महाराष्ट्र स्टुडंट युनियन यांनी यासंदर्भात विद्यापीठाला परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात पत्र पाठवले आहे. अद्याप मुंबई विद्यापीठाकडून यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा स्पष्टीकरण आलेले नाही. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर पुन्हा गोंधळ उडाल्यास विद्यार्थ्यांना मनस्ताप झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
TYBCom विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर ना परीक्षेची वेळ ना तारीख
काही दिवसांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या (T.Y.B.Com.) परीक्षेच्या हॉल तिकीटवरून गोंधळ झाला आहे. हॉल तिकीटवर परीक्षेची वेळ नाही, ना परीक्षेची तारीख, त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. या गोंधळावर मुंबई विद्यापीठाने स्पष्टीकरण देत सांगितले होते की, सध्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली हॉल तिकीट ही तात्पुरती असून लवकरच वेळापत्रकासह हॉल तिकीट देणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने म्हटले आहे. हॉल तिकीटवर ना परीक्षेची वेळ ना तारीख, ना आसन व्यवस्थेचे योग्य नियोजन होते. विद्यापीठाने परीक्षेची तातडीने योग्य नियोजन करण्याची युवा सेना ठाकरे गटाने मागणी केली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Mumbai University Examination : TYBCom विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर ना परीक्षेची वेळ ना तारीख; मुंबई विद्यापीठाने सांगितले हे तर...
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI