एक्स्प्लोर

Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद

Pune Petrol Diesel gas shortage: इराण-इस्रायल युद्धामुळे आगामी काळात भारतात भीषण इंधन टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पेट्रोल पंपचालकांना तेल कंपन्यांचा मेसेज

Pune fuel shortage Iran War: पश्चिम आशियातील आखाती परिसरात इराण विरुद्ध इस्रायल-अमेरिका यांच्या सुरु असलेल्या युद्धाच्या झळा आता महाराष्ट्राला जाणवायला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इंधनाचे आणि गॅसचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. विशेषत: पुण्यात येत्या काही दिवसांमध्ये इंधन टंचाई (Fuel Shortage) निर्माण होण्याचे संकेत मिळत आहेत. कालपासून पुण्यात सीएनजी आणि एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर आता युद्धामुळे पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर (Diesel Price) वाढण्याची शक्यता आहे. 

इराण विरुद्ध अमेरिका युद्धामुळे पश्चिम आशियातून होणारी इंधनाची वाहतूक बंद झाली आहे. कतारमधून होणारा नैसर्गिक वायूचा पुरवठा बंद झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात इंधन आणीबाणी लागू होण्याची चिन्हं दिसत आहेत. पुण्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या दरांमुळे महिलांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने त्याचा थेट परिणाम त्यांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. महिलांचे म्हणणे आहे की, गॅसचे दर वाढत आहेत, तेलाचे दर वाढत आहेत, किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे दरही वाढले आहेत. मात्र आमचे पगार काही वाढत नाहीत. गॅस एजन्सीकडे गेल्यानंतर अनेक वेळा वेळेवर गॅस मिळत नाही, अशी तक्रारही महिलांनी केली आहे. काही ठिकाणी गॅस उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते, तर काही वेळा ब्लॅकमध्ये गॅस विकला जात असल्याचा आरोपही महिलांनी केला. मात्र ब्लॅकमध्ये गॅस घेणे सर्वसामान्य कुटुंबांना परवडणारे नाही.घरखर्च आधीच वाढला आहे. अशा परिस्थितीत गॅस सिलेंडरचे वाढते दर आम्ही कसे परवडवायचे? घर चालवायचे तरी कसे?, असा सवाल सामान्य गृहिणी विचारत आहेत.

Commercial Gas: व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत वाढल्याने हॉटेल व्यावसायिकांवर संकट

अमेरिका, इराण आणि इस्रायलमधील  युद्धामुळे जागतिक पातळीवर परिणाम होत असून त्याचा फटका भारतालाही बसत आहे. सध्या देशात एलपीजी गॅसची तुटवड्याची परिस्थिती जाणवत आहे. याचा सर्वात मोठा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे.कमर्शियल एलपीजी गॅसचे दर अचानक 150 ते200 रुपयांनी वाढले आहेत. यामुळे हॉटेल व्यवसाय पुढे कसा चालवायचा, हा प्रश्न व्यवसायिकांसमोर उभा राहिला आहे. सध्या गॅस सप्लाय कधी सुरळीत होईल, याबाबतही कोणतीही स्पष्टता नाही. हॉटेल मालकांचा सरकारकडे असा आग्रह आहे की, त्यांनी त्वरित सहकार्य करून गॅस पुरवठ्यात सुधारणा करावी. कमर्शियल एलपीजी गॅस पूर्णपणे बंद असल्यामुळे हॉटेल्समध्ये स्वयंपाकासाठी गॅस उपलब्ध नाही. परिणामी कामकाजावर गंभीर अडथळा निर्माण झाला आहे आणि उद्योगाची दिनचर्या प्रभावित होत आहे.

Pune News: पुण्यात गॅस टंचाईचा फटका, वैकुंठातील गॅस दाहिन्या दोन दिवसांपासून बंद

युद्धजन्य परिस्थितीमुळे पुण्यात कमर्शियल एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम आता पुण्यातील अंत्यसंस्कार व्यवस्थेवरही होताना दिसत आहे. पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात असलेल्या वैकुंठ स्मशानभूमीत गॅसवर चालणाऱ्या दाहिन्या सध्या बंद ठेवाव्या लागल्या आहेत. येथे एकूण पाच गॅस दाहिन्या असून, गॅस पुरवठा बंद झाल्यामुळे मागील दोन दिवसांपासून त्या पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. गॅस उपलब्ध नसल्यामुळे सध्या अंत्यसंस्कार विद्युत दाहिनी किंवा पारंपरिक पद्धतीने लाकडांवरच करण्यात येत आहेत. 

आणखी वाचा

युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईल्सचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sheetal Tejwani Pune Land Scam : मुंढवा जमीन घोटाळ्यातील 'मास्टरमाईंड' शीतल तेजवानीला जामीन, बावधन पोलिसांचा 'या' चुकांमुळे तुरुंगातून सुटली, हलगर्जीपणा नडला
मुंढवा जमीन घोटाळ्यातील 'मास्टरमाईंड' शीतल तेजवानीला जामीन, बावधन पोलिसांचा 'या' चुकांमुळे तुरुंगातून सुटली, हलगर्जीपणा नडला
Pune Crime: नवरा-सेक्रेटरीच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली, बायकोने प्रेयसीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरुन ऑफिसमध्येच ठेवला, पुण्यातील हादरवणारी घटना
नवरा-सेक्रेटरीच्या अनैतिक संबंधांची कुणकुण लागली, बायकोने प्रेयसीला संपवलं, मृतदेह पोत्यात भरुन ऑफिसमध्येच ठेवला, पुण्यातील हादरवणारी घटना
Pune Airport: मोठी बातमी! पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात; तात्पुरती धावपट्टी बंद, अनेक विमानांना फटका, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! पुणे विमानतळावर भारतीय हवाई दलाच्या विमानाचा अपघात; तात्पुरती धावपट्टी बंद, अनेक विमानांना फटका, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; आता, भाजपकडून स्पष्टीकरण
मोठी बातमी! प्रवीण दरेकर पुढचे सहकार मंत्री, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; आता, भाजपकडून स्पष्टीकरण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान
Womens Reservation Bill Update : महिला आरक्षण विधेयक नामंजूरवर शिक्का, सरकारला मोठा धक्का
Vidhan Parishad Election : विधान परिषदेत ठाकरेंवरुन आघाडी नाहीतर बिघाडी? Special Report
Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
हेअरपिन वळणावर भरधाव टेम्पो ट्रॅव्हलरवरील नियंत्रण सुटल्याने घसरून दरीत कोसळला; 9 जणांचा जीव गेला, 4 गंभीर जखमी
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
आपल्या सर्वांनाच महिलांनी खूप काही शिकवलंय, अगदी पत्नीत्नेही, पण पंतप्रधान आणि मी... राहुल गांधींच्या वक्तव्याने संसदेत हशा पिकला
Gold Silver Price: अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
अक्षय्य तृतीया अन् लग्नाची खरेदी करायचा विचार करताय? मग आधी सोन्या-चांदीचे ताजे भाव तपासा; जाणून घ्या आजचे दर!
LizLaz on Virat Kohli: किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
किंग कोहलीनं फोटो लाईक करताच जर्मनीपासून भारतापर्यंत सोशल मीडियात एकच धुमाकूळ; अखेर त्या मादक माॅडेलनं मौन सोडलं! सूचक वक्तव्य करत म्हणाली..
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
मुंबईची चर्चा सुरु असतानाच आता दैना झालेल्या केकेआरमध्येही वादळं उठलं, पहिली कुऱ्हाड टीमच्या गुरुजींवर कोसळणार? आयपीएलच्या मध्यावरच दिग्गजाचा दावा, म्हणाला, 'जे बोलतोय ते बुकमार्क करून ठेवा!'
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Scholarship Exam : राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
राज्याच्या शिक्षण विभागाचा अजब अन् असंवेदनशील प्रकार, ऐन उन्हाळ्यात चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा; शिक्षण परीक्षा परिषदेच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप
Embed widget