एक्स्प्लोर

मोदीजी, आपण शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अण्णा हजारेंचं पंतप्रधानांना पत्र; युद्ध परिस्थितीवर भाष्य, परखड भूमिका

वेगवेगळ्या देशात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे.

अहिल्यानगर : जगाचं लक्ष सध्या अमिरेका (America), इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाकडे लागले असून युद्धाविराम (War) कधी होईल, याचीच वाट सर्वजण पाहात आहेत. या युद्धाचे परिणाम जागतिक पातळीवर होत असून हजारो नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. भारतानेही युद्धसंदर्भाने भूमिका स्पष्ट करत युद्ध थांबवण्याची गरज व्यक्त केली आहे. तसेच, आखाती देशात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरुन संपर्कही केला होता. त्यातच, आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna hajare) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून युद्धजन्य परिस्थितीत भारताने शांततेसाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. 

जगातील वेगवेगळ्या देशात वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताने शांततेसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. जगभरात सुरू असलेल्या संघर्षांमुळे सामान्य नागरिक, महिला आणि मुलांवर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. भारताची संस्कृती अहिंसा आणि शांततेची असून भारताने जगासमोर संवाद आणि शांततेचा मार्ग पुढे करावा, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. युद्धामुळे विनाश होतो, तर संवादातूनच स्थैर्य आणि समाधानाचा मार्ग निघतो. त्यामुळे भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे.

यु्द्धाच्या पार्श्वभूमीवर अलीकडील घटनांमध्ये निरपराध महिला, मुले आणि कुटुंबांवर होत असलेल्या परिणामांच्या बातम्या अत्यंत दु:खद आणि वेदनादायी आहेत. युद्ध आणि संघर्षाचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांनाच बसतो, ही बाब लक्षात घेऊन जागतिक स्तरावर भारताकडून शांततेसाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. भारताची परंपरा ही अहिंसा, शांतता आणि संवादाची राहिली आहे. इतिहासात भारताने नेहमीच जगाला संवादाचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अशा परिस्थितीत भारतासारख्या मोठ्या लोकशाही राष्ट्राकडून मानवता आणि शांततेचा संदेश जाणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

जगाला शस्त्राची नव्हे, संवादाची गरज

आजच्या जगाला शस्त्रांची नव्हे तर विश्वास, सहकार्य आणि संवादाची गरज आहे. युद्धामुळे केवळ विनाश होतो, तर संवादातून समाधान आणि स्थैर्याचा मार्ग निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भारताने तटस्थ आणि जबाबदार भूमिका घेत जागतिक स्तरावर शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अनेक जागतिक प्रश्नांवर सकारात्मक भूमिका बजावली आहे. त्यामुळे या संवेदनशील काळात भारताने मानवतेच्या आणि शांततेच्या बाजूने पुढे येत संवाद आणि सहकार्याचा मार्ग मजबूत करावा, अशी अपेक्षाही हजारे यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा

Video: इकडं अमेरिकेनं सर्वात मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला तिकडं इराणनं दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या रनवेवर ड्रोन धडकवला; एअरपोर्ट बंद करण्याची पाळी

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Pratibha Dhanorkar: सुधीर मुनगंटीवार भाषणाला उभे राहताच..., प्रतिभा धानोरकरांचं थेट स्टेजवरून 'वॉक आऊट'; चंद्रपुरात 'राजशिष्टाचारा'वरून ठिणगी, नेमकं काय घडलं?
सुधीर मुनगंटीवार भाषणाला उभे राहताच..., प्रतिभा धानोरकरांचं थेट स्टेजवरून 'वॉक आऊट'; चंद्रपुरात 'राजशिष्टाचारा'वरून ठिणगी, नेमकं काय घडलं?
Mira Bhayandar Crime News: लग्नाचं आश्वासन देऊन ऑफिस, लॉजवर महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवले, भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
लग्नाचं आश्वासन देऊन ऑफिस, लॉजवर महिलेशी बळजबरी शारीरिक संबंध ठेवले, भाजप नगरसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
Bollywood Actress Struggle Life: कधीकाळी ज्या अभिनेत्याची हिरोइन बनली, 5 वर्षांनी खऱ्या आयुष्यात त्यांच्याच स्टार मुलासोबत थाटला संसार, आता लेक बॉलिवूडचा हँडसम हंक; ओळखलं का कोण?
कधीकाळी ज्या अभिनेत्याची हिरोइन बनली, 5 वर्षांनी खऱ्या आयुष्यात त्यांच्याच स्टार मुलासोबत थाटला संसार, आज लेक बॉलिवूडचा हँडसम हंक; ओळखलं का कोण?
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
Embed widget