'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
केंद्रीयमंत्री असलेल्या टीडीपीच्या नेत्यांचे व्हीएसआर कंपनीच्या मालकांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे, टीडीपी नेत्यांना मंत्रिमंडळात ठेवणं योग्य नाही.

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते तथा दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाताची सखोल चौकशी करावी, तसेच डीजीसीएच्या अहवालावर प्रश्न उपस्थित करत आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र विधानसभेनंतर आता दिल्लीच्या संसदेतही या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी विविध नेत्यांची भेट घेतली आहे. आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी राज्यसभेत अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा उपस्थित करावा, अशी मागणी रोहित पवार (rohit Pawar) यांनी दिल्लीत त्यांची भेट घेऊन केली. संसदेत जे सामन्याचा आवाज उठवतात आणि मनापासून लोकांच्या हितासाठी लढतात त्या खासदारांचा भेटून आम्ही अजित पवार अपघाताची माहिती देतोय. मराठी माणसाला न्याय दिला जात नाही, व्हीएसआर कंपनीविरुद्ध एफआयआर होत नाही. यासंदर्भातील मुद्दा संसदेत उचलावा, अशी मागणी आपण केल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं,
केंद्रीयमंत्री असलेल्या टीडीपीच्या नेत्यांचे व्हीएसआर कंपनीच्या मालकांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे, टीडीपी नेत्यांना मंत्रिमंडळात ठेवणं योग्य नाही. 11 ऐवजी 12 रूल अंतर्गत तपास करावा. तसेच, डीजीसीएमध्ये मोठे बदल व्हावेत अशी आमची इच्छा आहे, असेही रोहित पवार यांनी संजय सिंह यांच्या भेटीनंतर बोलताना म्हटले. तसेच, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही त्यांनी भेट घेतली. या भेटीतही अजित पवारांच्या विमान अपघाताची आणि डीजीसीएच्या तपासासंदर्भात त्यांनी माहिती दिली.
टीडीपीच्या नेत्यांना मंत्रिमंडळातून हटवावं
टीडीपी पक्षाच्या नेत्याचं आणि व्हिएसआर कंपनीच्या नेत्याचं जवळचं आर्थिक आणि व्यक्तिगत नातं असल्याने तपास योग्य रितीने होणार नाही. त्यामुळे, त्या नेत्याला तिथं ठेवणं योग्य नाही. त्यामुळे, डीजीसीएनेही तपास अधिकाऱ्यांची नव्याने नेमणूक करावी, अशी मागण आमदार रोहित पवार यांनी केली आहे. या अपघाताचा तपास 12 रुल अंतर्गत करावा, अशी मागणी संजय सिंह यांची भेट घेऊन केली आहे. संजय सिंह यांचा याबाबत अभ्यास आहे, त्यामुळे मी त्यांची भेट घेतल्याचेही रोहित पवार यांनी सांगितले.
देशातील लढवय्ये नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मा. अरविंद केजरीवाल साहेब यांची दिल्लीत भेट घेऊन अजितदादांच्या विमान अपघाताबाबत त्यांच्याशी चर्चा केली आणि गेल्या काही दिवसांपासून याबाबत जमा केलेल्या संपूर्ण माहितीचं प्रेझेंटेशन त्यांना दिलं. त्यांनीही याबाबतचे सगळे तपशील… pic.twitter.com/e8wNoCt9mv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 7, 2026
विमानाच्या ब्लॅकस बॉक्समध्ये गडबड हेच संशयास्पद?
मी आजपर्यंत कधीच ऐकलं नव्हतं की, ब्लॅक बॉक्समध्ये गडबड आहे. मात्र, अजित पवारांच्या विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्समध्येच गडबड असल्याचं सांगितलं जात असल्याने इथेच अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याचं खासदार संजय सिंह यांनी रोहित पवारांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं.
हेही वाचा
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य






















