एक्स्प्लोर

'स्वप्न थडग्यात घेऊन जाल' ट्रम्प यांच्या बिनशर्त शरणागतीच्या प्रस्तावाला निकराने प्रतिकार करणाऱ्या इराणकडून केराची टोपली; राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री काय म्हणाले?

काही देश मध्यस्थीसाठी प्रयत्न करत आहेत, परंतु अशी कोणतीही चर्चा 'देशाचा स्वाभिमान आणि सार्वभौमत्व' गहाण ठेवून केली जाणार नाही, असे इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी सांगितले.

Iran on Unconditional Surrender: डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेल्या 'बिनशर्त शरणागती' (Unconditional Surrender) च्या इशाऱ्यानंतर इराणच्या नेतृत्वाने ट्रम्प यांचा हा प्रस्ताव केवळ धुडकावून लावला नाही, तर अत्यंत आक्रमक शब्दांत त्याला प्रत्युत्तर दिले आहे. स्वप्न थडग्यात घेऊन जाल, अशा शब्दात राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान (Masoud Pezeshkian) यांनी ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर पलटवार केला आहे.  

स्वप्न आपल्या थडग्यात घेऊन जातील

इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी आज (7 मार्च) देशवासियांना संबोधित करताना ट्रम्प यांच्या मागणीची खिल्ली उडवली. त्यांनी म्हटले की, जे लोक इराणच्या बिनशर्त शरणागतीचे स्वप्न पाहत आहेत, त्यांनी हे लक्षात ठेवावे की ते हे स्वप्न आपल्या थडग्यात (Graves) घेऊन जातील. त्यांनी कबूल केले की काही देश मध्यस्थीसाठी प्रयत्न करत आहेत, परंतु अशी कोणतीही चर्चा 'देशाचा स्वाभिमान आणि सार्वभौमत्व' गहाण ठेवून केली जाणार नाही. शेजारी राष्ट्रांबाबत त्यांनी मवाळ भूमिका घेतली असून, ज्या देशांनी इराणवर हल्ला करण्यासाठी आपली जमीन वापरू दिली नाही, त्यांच्यावर इराण हल्ला करणार नाही, असे स्पष्ट केले. 

आम्ही वाट पाहत आहोत

दुसरीकडे, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ट्रम्प यांच्या जमीन मार्ग हल्ल्याच्या शक्यतेवर कडक भाषेत प्रत्युत्तर दिले. "आम्ही वाट पाहत आहोत" अशा शब्दात अब्बास अराघची (Abbas Araghchi) यांनी थेट आव्हान दिले. जर अमेरिकन सैन्य इराणच्या भूमीवर उतरणार असेल तर आम्ही त्यांची वाट पाहत आहोत. त्यांच्यासाठी हे मोठे संकट ठरेल, असा इशारा त्यांनी दिला.  त्यांनी स्पष्ट केले की इराणची लष्करी शक्ती अशा कोणत्याही आक्रमणाला चोख उत्तर देण्यास समर्थ आहे.

अमेरिकेने इराणच्या अंतर्गत बाबींत हस्तक्षेप करू नये

दरम्यान, संयुक्त राष्ट्रातील (UN) राजदूत अमीर सईद इरावानी म्हणाले, ट्रम्प यांनी म्हटले होते की त्यांना इराणच्या नवीन 'सुप्रीम लीडर'च्या निवडीत सहभाग हवा आहे. यावर इरावानी यांनी ठणकावून सांगितले की, इराणचे नेतृत्व कोण असेल हे केवळ इराणची जनता आणि संविधानानुसार ठरवले जाईल, त्यात परकीय हस्तक्षेपाला जागा नाही. त्यांनी आरोप केला की अमेरिका आणि इस्रायलने जाणीवपूर्वक नागरी वस्त्यांवर हल्ले केले असून, यात आतापर्यंत 1332 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. माजी परराष्ट्र मंत्री मोहम्मद जवाद झरीफ यांनी 'राजनैतिक' विश्लेषण मांडले. ट्रम्प यांना लांबलचक तांत्रिक योजनांमध्ये रस नाही, त्यांना फक्त 'विजयाची जाणीव' (Sense of Victory) हवी आहे. त्यामुळे युद्ध टाळण्यासाठी काही प्रतीकात्मक पावले उचलली जाऊ शकतात, परंतु ती इराणच्या सन्मानाला धक्का न लावता असावीत.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Iran War Live Update: ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
ट्रम्प एका तासात सात वेळा खोटं बोलले; इराणचा गंभीर आरोप, ट्रम्पचा प्रत्येक खोडून काढला! युद्धबंदीची आशा वाढली असतानाच पुन्हा नवं संकट
Nepal Politics: देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
देशाचा राजा, 7 माजी पंतप्रधान, 3 माजी राष्ट्रपती अन् 100 मंत्री, अधिकाऱ्यांवर एकाचवेळी सर्जिकल स्ट्राईक; नेपाळमध्ये भ्रष्टाचाराविरोधात सर्वात तगडी चौकशी सुरु
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crude Oil in India : जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
जगाला चकवा देत जया, डोरना आणि फेलिसिटी भारतात दाखल, हॉर्मुझमधून 60 लाख बॅरेल इराणी तेल देशात
AI In Power Sector : वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
वीजपुवठा सुरळीत ठेवण्यासाठी AI चा वापर करा; मुख्यमंत्र्यांचे ऊर्जा विभागाला निर्देश
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
महागाई भत्त्यात केंद्र सरकारकडून मोठी वाढ; 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 69 लाख निवृत्तीवेतनधारकांना फायदा होणार
Iran War Live Update: अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
अमेरिकेला लाल समुद्रातील हुथी बंडखोरांची धडकी भरली; जगातील सर्वाधिक शक्तिशाली नौदलाच्या युद्धनौकेला अख्ख्या आफ्रिका खंडाला वळसा घालून इराणकडे येण्याची वेळ!
Iran War Live Update: 'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
'तोपर्यंत जहाजांना होर्मुझमधून जहाजांना अजिबात जाऊ देणार नाही' इराणनं अवघ्या 24 तासांमध्येच मार्ग करत जगाची नाडी पुन्हा आवळली, अमेरिकेला गर्भित इशारा
Pat Cummins: वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
वनडे वर्ल्डकपमध्ये 140 कोटी जनतेला एका झटक्यात शांत करणारं 'ब्रह्मास्त्र' हैदराबाद संघात दाखल, तरीही संघाचं टेन्शन कायम!
Rahul Gandhi on Women's Reservation Bill: राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
राहुल गांधींच्या भाषणावेळी 'ती' गोष्ट सर्वांच्याच नजरेत भरली, एका कृतीने देशभरातील महिलांना सूचक संदेश
Priyanka Gandhi on BJP: संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
संसदेत तुम्ही स्वत:ला महिलांचे कैवारी म्हणवून घेता, पण उन्नाव, हाथरस, मणिपूरमध्ये सगळ्यांनी पाहिलंय... प्रियांका गांधींचा भाजपला सणसणीत टोला
Embed widget