एक्स्प्लोर

Mumbai University Examination : TYBCom विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर ना परीक्षेची वेळ ना तारीख; मुंबई विद्यापीठाने सांगितले हे तर...

Mumbai University Examination : मुंबई विद्यापीठाने कॉमर्स शाखेच्या सहाव्या सेमेस्टर परीक्षेच्या हॉल तिकीट गोंधळाबाबत मुंबई विद्यापीठाने स्पष्टीकरण दिले आहे.

Mumbai University Examination :  मागील काही वर्षांपासून मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) परीक्षा आणि गोंधळ असे समीकरण झाल्याचे चित्र आहे. यंदादेखील मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या (T.Y.B.Com.) परीक्षेच्या हॉल तिकीटवरून गोंधळ झाला आहे. हॉल तिकीटवर परीक्षेची वेळ नाही, ना परीक्षेची तारीख, त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे. या गोंधळावर आता मुंबई विद्यापीठाने स्पष्टीकरण दिले आहे. सध्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेली हॉल तिकीट ही  तात्पुरती असून लवकरच वेळापत्रकासह हॉल तिकीट देणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने म्हटले आहे. 

मुंबई विद्यापीठाने हॉल तिकीट गोंधळावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, परीक्षेची ही प्रवेशपत्रे  तात्पुरती आहेत. वेळापत्रकासह प्रवेशपत्रे लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. मुंबई विद्यापीठाने यावर्षी प्रथमच विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी दोन महिने आधी परीक्षेची प्रवेशपत्रे दिलेली आहेत. विद्यार्थ्यांचे नाव, त्यांनी घेतलेले विषय व इतर काही दुरुस्ती असेल तर ती करता यावी, या उद्देशाने ही अस्थायी प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. 

ही प्रवेशपत्रे अस्थायी असून वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर ते वेळापत्रक परीक्षेच्या प्रवेशपत्रावर प्रदर्शित होईल,अशा सूचना या प्रवेशपत्रावर देण्यात आल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. त्यानुसार आता वेळापत्रकासह प्रवेशपत्रे लवकरच विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. तसेच आसन व्यवस्थाही ही देखील अस्थायी असून येत्या काही दिवसात निश्चित आसन व्यवस्था प्रदर्शित केली जाणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले. 

मात्र,  परीक्षेला अवघे चार ते पाच दिवस राहिले असताना विद्यार्थ्यांना नव्याने हॉल तिकीट विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ऐन परीक्षेच्या तोंडावर पुन्हा गोंधळ उडाल्यास विद्यार्थ्यांना मनस्ताप झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

प्रकरण काय?

मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होण्याआधीच गोंधळ झाला असल्याचा आरोप करण्यात आला. हॉल तिकीटवर ना परीक्षेची वेळ ना तारीख, ना आसन व्यवस्थेचे योग्य नियोजन होते. विद्यापीठाने परीक्षेची तातडीने योग्य नियोजन करण्याची युवा सेना ठाकरे गटाने मागणी केली होती. मुंबई विद्यापीठाच्या कॉमर्स शाखेच्या सहाव्या सेमिस्टरची परीक्षा 6 एप्रिल पासून सुरू होत आहे. 

गोरेगाव पश्चिमेला असलेल्या यशभाई मगनभाई पटेल महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर 300 विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्यासाठी आसन क्षमता आहे. मात्र, 2000 विद्यार्थ्यांना या महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. ठाकरे गटाच्या युवासेनेने आता ही बाब निदर्शनास आणल्यानंतर 1700 विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्र ऐनवेळी बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
उत्तरेत तापमान शून्याच्या खाली, राज्यात पुढील 24 तासांत होणार बदल, आठवडाभर कसं असेल हवामान?
Akola Municipal Corporation 2026: सगळ्यात जास्त जागा तरी भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेत कोणाचा महापौर?
सगळ्यात जास्त जागा तरी, भाजप समोर मोठं आव्हान; मित्र पक्षांचा साथीनं काँग्रेसकडूनही तगडी फिल्डिंग, त्रिशंकू अकोला महापालिकेच्या सत्तेच्या चाब्या कोणाकडे जाणार?
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
Embed widget