एक्स्प्लोर

Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य

Mumbai Feriwala attack on BMC workers: काही महापालिकेचे कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांनी 12 ते 13 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांदिवलीत फेरीवाल्यांचा हल्ला

Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईच्या कांदिवली परिसरात शुक्रवारी फेरीवाल्यांच्या मोठ्या जमावाने मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली. मुंबई महानगरपालिकेचे (BMC) कर्मचारी काल संध्याकाळी कांदिवली लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर (Feriwala) कारवाई करण्यासाठी गेले होते. त्यावेळी याठिकाणी जमलेल्या जमावाने त्यांच्यावर चाल करुन जात पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण (Attack) केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले आहे. (Mumbai news)

कांदिवलीतील या घटनेच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत फेरीवाल्यांनी पालिका कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचे दिसत आहे. पालिकेचे कर्मचारी रस्त्यावरील अनधिकृत दुकानांवर कारवाई करत असताना याठिकाणी जमलेल्या प्रचंड जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा काल विधानसभेत गाजत असतानाच संध्याकाळी कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरामध्ये याच अनाधिकृत फेरीवाल्यांनी महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांवरती हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये काही महापालिकेचे कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांनी 12 ते 13 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील चार ते पाच जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतले आहे. हल्ला करणारे हे क्रांती नगर मधील मुस्लिम आणि बांगलादेशी असल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी  केला आहे. त्यामुळे या अनाधिकृत फेरीवाल्यांच्या मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

यासंदर्भात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. अनधिकृत फेरीवाल्यांनी काल जो हल्ला केला त्यातील हल्लेखोर हे मुस्लिम आणि बांगलादेशी  आहेत. यासंदर्भात कालच सभागृहात हा विषय मांडला होता. या सर्वांवरती कठोर कारवाई करण्यात यावी, असे  मी आदेश दिलेले आहेत. महापालिकेत आमची सत्ता आहे आणि म्हणूनच यावरती कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता असल्याचे मी सांगितले आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती असा हल्ला कधीही खपवून घेतला जाणार नाही. कालच यावरती विधानसभेत लक्षवेधी झाली. सोमवारी मी पुन्हा एकदा हा मुद्दा लावून धरणार आहे. हल्ला करणाऱ्यांच्या मागे राजकीय कोणी आहे का नाही माहिती नाही. मात्र, हल्लेखोरांमध्ये मुस्लिम आणि बांगलादेशी असल्याचे स्पष्ट आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले.

आणखी वाचा

कांदिवलीत खळबळजनक घटना, पती-पत्नीचं कडाक्याचं भांडण, बायकोने गळ्याला दोर लावून आयुष्य संपवलं

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime News: विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
विक्रोळीतील ज्या घरात वडील-मुलाचा दुर्दैवी अंत झाला, आता 'सील' केलेल्या त्याच घराला लागली भीषण आग; सिलिंडरचाही स्फोट, नेमकं काय घडलं?
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
कौटुंबिक वाद विकोपाला, सख्या चुलतभावानेच संपवलं भावाला, धक्कादायक घटनेनं अकोला हादरलं
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget