एक्स्प्लोर

Mumbai News : नवऱ्याने पेटवलं, रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेसाठी रिक्षाचालक मदतीला, जीवाची बाजी लावून रुग्णालयात दाखल

Mumbai News : मुंबईतील एक रिक्षाचालक महिलेसाठी देवदूत ठरला आहे. पेटलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने मदतीची याचना करणाऱ्या महिलेला रिक्षाचालक मोहम्मद इस्माईल शेख यांनी वाचवलं.

Mumbai News : मुंबईतील (Mumbai) एक रिक्षाचालक (Autorickshaw Driver) महिलेसाठी देवदूत ठरला आहे. पेटलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने मदतीची याचना करणाऱ्या महिलेला रिक्षाचालक मोहम्मद इस्माईल शेख यांनी वाचवलं. मुंबईतील नेहरुनगर पोलिसांनी मोहम्मद इस्माईल यांचा सत्कार करुन त्यांच्या धाडसाचे आणि मानवतेचे कौतुक केलं. सोबतच समाजात शांतता अबाधित ठेवण्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.

काय आहे नेमकी घटना?

अण्णाभाऊ साठे ब्रिजच्या खाली एक महिला पेटवलेल्या अवस्थेत जीवाच्या आकांताने केविलवाणी मदत याचना करत होती. यावेळी रस्त्यावरुन भरधाव वेगाने वाहनं जात होती, परंतु कोणीही वाहन थांबून मदतीची भावना दाखवली नाही. दरम्यान मोहम्मद इस्माईल या रिक्षाचालकाने या महिलेला पाहिलं. आपलं भाडे आणि रोजी रोटी कमाईचा वेळ सोडून त्यांनी रिक्षा थांबवून त्यामधील पाण्याची बॉटल पेट घेतलेल्या महिलेच्या अंगावर ओतली. आग विझवली आणि तिला सायन रुग्णालयात दाखल केले. रिक्षाचालकाच्या मदतीमुळे ही महिला केवळ दहा टक्के भाजली आहे. ही महिला सायन रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे.

भांडणातून पतीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकलं

संबंधित महिला चुनाभट्टीमधील सुमननगर इथली रहिवासी आहे. 14 जून रोजी ही महिला वडाळा इथे कामावर जात होती. सकाळी आठच्या सुमारास ही महिला अण्णाभाऊ साठे ब्रिजजवळ बस स्टॉपवर आली. घरातून निघण्यापूर्वी महिलेचं पतीसोबत भांडण झालं होतं. पतीने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. यावेळी तिचा पती सव्वाआठच्या सुमारास अचानक तिच्याजवळ आला. त्याने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून लायटरने आग लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी ती मदतीसाठी याचना करत होती. परंतु कोणीही थांबलं नाही. अखेर रिक्षाचालक मोहम्मह शेख यांनी थांबून महिलेच्या अंगावर पाणी ओतून आग विझवली आणि त्यांना रुग्णालयात दाखल केलं. यानंतर महिलेच्या भावाच्या तक्रारीवरुन नेहरुनगर पोलीस ठाण्यात आरोपी संजय रमाकांत ठाकूर यांच्याविरोधात भादंवि कलम 307, 326 (ब) 504, 506 भादवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून रिक्षाचालकाचा सत्कार

मो. इस्माईल शेख हा मुस्लीम धर्मीय आणि जळणारी महिला ही हिंदू धर्मीय होती. मोहम्मद इस्माईल यांनी जातीयतेच्या भिंती तोडून "हम सब एक है" या घोषवाक्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सध्याच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मानव यंत्राच्या गतीने धावत असताना पोलिसांच्या आवाहनानंतर मदत करणाऱ्यांची संख्या तोकडी आहे. मात्र मोहम्मद इस्माईल यांनी केलेल्या कृत्यामधून मानवता जिवंत असल्याचं दर्शन घडलं. त्यांच्या या धाडसाचं आणि मानवतेचं नेहरुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युसुफ सौदागर यांनी कौतुक केलं. रिक्षाचालक मोहम्मद इस्माईल शेख यांचा सत्कार केला. सोबतच यापुढेही समाजात शांतता अबाधित ठेवण्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केलं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sahil Khan: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान ताब्यात
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, छत्तीसगढमधून अभिनेता साहिल खान ताब्यात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sharad Pawar Shevgan Rally : निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज शेवगावमध्ये सभाEknath Shinde Meeting : कोल्हापूरसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा बैठक, घाटगेंसोबत चर्चाSanjay Pandey : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यताUjjwal Nikam  Mumbadevi :  उज्जवल निकम मुंबा देवीच्या दर्शनाला : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sahil Khan: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान ताब्यात
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, छत्तीसगढमधून अभिनेता साहिल खान ताब्यात
IPL 2024 DC vs MI: रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
Eknath Shinde: मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याची हमी
मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याचा शब्द
IPL 2024 Latest Points Table: दिल्लीची मोठी झेप, मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
दिल्लीची मोठी झेप, मुंबईची नवव्या क्रमांकावर घसरण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
Horoscope Today 28 April 2024 : एप्रिलचा शेवटचा रविवार 12 राशींसाठी शुभ की अशुभ? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
एप्रिलचा शेवटचा रविवार 12 राशींसाठी शुभ की अशुभ? वाचा सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Embed widget