एक्स्प्लोर

अश्लील व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड करुन कोट्यवधी कमावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, सायबर पोलिसांकडून 3 यूट्यूबर्स अटकेत

प्रँक व्हिडीओच्या नावावर अश्लील व्हिडीओ बनवून यूट्यूबवर अपलोड करुन कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सायबर पोलिसांकडून तीन यूट्यूबर्सना अटक करण्यात आली आहे.

मुंबई : मुंबई क्राईम ब्रान्चच्या सायबर पोलिसांनी यूट्यूब चॅनल चालवणाऱ्या तिघांना अटक केली आहे. हे आरोपी प्रँक व्हिडीओच्या नावावर अश्लील व्हिडीओ बनवून यूट्यूबवर अपलोड करत होते आणि त्याच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावत होते. मुकेश गुप्ता (ठाण्यात क्लास चालवतो), जितेंद्र गुप्ता (बीएचएमएस करत असून दुसऱ्या वर्षात आहे) आणि नटखट उर्फ प्रिन्स कुमार (बीएमएमच्या दुसऱ्या वर्षात आहे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

क्राईम ब्रान्चचे सहआयुक्त मिलिंद भरांबे यांनी सांगितलं की, हे लोग प्रँकच्या नावावर अश्लील व्हिडीओ बनवून यूट्यूबवर अपलोड करायचे, ज्याद्वारे त्यांनी बक्कळ पैसा कमावला होता.

लॉकडाऊनमध्ये कोट्यवधीची कमाई एकीकडे लॉकडाऊनमुळे अनेकांचं व्यवसाय ठप्प झाले, नोकऱ्या गेल्या, त्यावेळी या आरोपींनी हे अश्लील व्हिडीओ यूट्यूब चॅनलवर अपलोड करण्यास सुरुवात केली. लॉकडाऊन काळात या लोकांना सुमारे दोन कोटी रुपये कमावले.

मिलिंद भरांबे यांनी सांगितलं की, आतापर्यंतच्या तपासात दोन कोटींचा आकडा समोर आला आहे, पण हा आकडा वाढूही शकतो. तपासादरम्यान पोलिसांना समजलं की, आरोपींचे एका व्हिडीओमागे दोन ते तीन हजार रुपये खर्च होत होते. त्या एका व्हिडीओच्या माध्यमातून आरोपी सुमारे 50 हजारांपर्यंत कमावत होते.

मोडस ऑपरेंडी ही टोळी मुलींना अभिनयाच्या नावाखाली बोलावत असे. त्यांना अभिनयासाठी 500 ते 1500 रुपये देत असत. यानंतर ते अश्लील व्हिडीओ बनवण्यासाठी त्यांना सार्वजनिक ठिकाणी जसं की बॅण्ड स्टॅण्ड, रॉक गार्डन, कार्टर रोड, आणि बीएमसीच्या काही मैदानात घेऊन जायचे. तिथे हे व्हिडीओ शूट करुन ते यूट्यूबवर अपलोड करायचे. या व्हिडीओंना लाखों व्ह्यूव्ज मिळायचे, याद्वारे आरोपींनी कोट्यवधी रुपये कमावले.

अटक केलेल्या आरोपींपैकी एक मुकेश गुप्ता हा ठाणे जिल्ह्यात क्लास घेतो. तो अभ्यासात हुशार होता आणि 2008 मध्ये दहावी बोर्ड परीक्षेत तो ठाणे जिल्ह्यात अव्वल आला होता. तपासात समोर आलं आहे की, त्याच्याकडे शिकणाऱ्या मुलांचाही त्याने व्हिडीओसाठी वापर केला, ती मुलं अल्पवयीन आहेत.

संघिटत पद्धतीने काम करणारी टोळी एका आरोपीने तर एक मॅनेजरही ठेवला आहे, जो चित्रपटसृष्टीशी संबंधित लोकांकडून कलाकार मागवत असे आणि त्यांना संपूर्ण भूमिका समजावत असे. यानंतर मुलीला अश्लील व्हिडीओ बनवण्यासाठी तयार केलं जात असे. त्यांचा एक व्हिडीओ जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटांचं असतो.

पोलिसांना आतापर्यंत अशा 17 यूट्यूब चॅनलबाबत माहिती मिळाली आहे, ज्यावर त्यांनी 300 पेक्षा जास्त व्हिडीओ अपलोड केले आहेत. पोलिसांनी अशाप्रकारचे अश्लील चॅनल्सही बंद करण्याची विनंती यूट्यूबला केली आहे आणि या प्रकरणी अधित तपास करत आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...Dinesh Lad EXCLUSIVE : फिटनेस ते रनिंग बिटविन द विकेट, Rohit Sharma Fitness ची अनटोल्ड स्टोरी!Santosh Deshmukh हत्येचे फोटो; Dhananjay Deshmukh यांची काळीज हेलावून टाकणारी प्रतिक्रियाSantosh Deshmukh Case Evidence : देशमुख हत्याप्रकरणातील EXCLUSIVE पुरावा;हत्येचे धक्कादायक फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
काळीज चिरणारे फोटो; नराधमांनी संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवलं, रॉडने मारलं, हसत-हसत मोबाईल शूट
Accident News: ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
ट्रक व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक; दुचाकीवरील दोन मुलांचा दुर्दैवी अंत, सांगोला महामार्गावरील भीषण दुर्घटना 
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
दत्ता गाडेच्या विचित्र आरोपामुळे पीडिता तणावात, वसंत मोरेंची भेट घेऊन सगळं सांगितलं; स्वागरेटमध्ये पहाटे नेमकं काय घडलं?
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
धक्कादायक! तब्बल 69 ATM कार्डसह पकडला चोरटा; चिकट पदार्थ टाकून पैसे काढण्याचं टेक्निक
Mahadev Munde : मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
मुंबईत अधिवेशन सुरू अन् बीडमध्ये महादेव मुंडेंच्या पत्नीचं आमरण उपोषण स्थगित; पोलिसांना एक महिन्याचा अल्टीमेटम
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Video: रोहित पवार लवकरच सत्तेत सहभागी होतील; अजित पवारांच्या आमदाराचा मोठा दावा, अधिवेशनात चर्चा
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Sunandan Lele on Rohit Sharma Fitness|फिटनेसवरून रोहित शर्मावर राजकीय टीका, सुनंदन लेले म्हणाले...
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड, आरोपी शिंदेसेनेचे कार्यकर्ते, सोशल मीडियावर PHOTOS व्हायरल
Embed widget