एक्स्प्लोर
Advertisement
CAA, NRC | आम्ही जे करतोय ते बाबासाहेबांनीच घटनेत लिहून ठेवलंय : नितीन गडकरी
नागरिकत्वाचा कायदा हा काही नवीन नाही, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू यांनी याबद्दल लिहून ठेवल्याचं नितीन गडकरी यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज पार पडत आहे. त्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपलं व्हिजन मांडलं.
मुंबई : नागरिकत्वाचा मुद्दा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच घटनेत लिहून ठेवल्याचं, वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात केलंय. आम्ही जे करतोय ते महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरु यांनीच लिहून ठेवलं आहे, ते आम्ही करत असल्याचं गडकरी यांनी सांगितले. एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज पार पडला, या कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. यावेळी नितीन गडकरी यांनी ग्रामीण, शहरी भागांची प्रगती, दळणवळण, इंधन निर्मिती, देशाची अर्थव्यवस्था, शेती अशा बऱ्याच विषयांवर आपलं व्हिजन महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलं. या क्षेत्रांमध्ये आगामी काळात नवीन पर्याय शोधण्याची गरज असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलं.
सुधारित नागरिकत्व कायदा हा नवीन कायदा नाहीय, तर यापूर्वीच महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित नेहरु यांनी यापूर्वीच लिहून ठेवलं आहे, असं नितीन गडकरी यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले. यावेळी गडकरी यांनी आपलं महाराष्ट्र आणि देशाबद्दलचं व्हिजन मांडलं. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज पार पडत आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांनी यात सहभाग घेतला.
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | शिवसेनेकडून लिहून घेतल्याच्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास : अशोक चव्हाण
प्रत्येक गोष्ट आपल्या देशात तयार व्हायला हवी : गडकरी
प्रत्येक गोष्ट आपल्या देशात तयार व्हायला हवी, कारण ती क्षमता आपल्या देशात आहे, असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मांडलं. मागील पाच वर्षात दळणवळण क्षेत्रात महाराष्ट्राने चांगल काम केलं आहे. मागील पाच वर्षात या क्षेत्रात मोठी कामे झाली असल्याचे गडकरींनी सांगितले. महाराष्ट्राला मोठा समुद्र किनारा लाभला आहे. मात्र, या पाण्याचा म्हणावा तसा वापर झालेला नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात जलसंपत्ती आहे, त्याचा वापर करणे महत्वाचे आहे. जलमार्ग वाहतूक तुलनेने स्वस्त आहे. त्यामुळेच आगामी काळात जलमार्गाने मुंबई ते गोवा वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | नाणार प्रकल्प आणायचा असेल तर स्थानिकांचा विचार गरजेचा : सुभाष देसाई
मुंबईत सी प्लेन सुरू करण्याची योजना -
मुंबईत सी प्लेन सुरू झाली तर कोकणातील कित्येक गावे या शहराशी जोडली जातील. कारण, पाण्यावरची वाहतूक ही महाराष्ट्रासाठी महत्वाची आहे. त्यामुळे आपल्या नद्यांमधून जलमार्ग तयार करण्याचे काम सुरू आहे. छोट्या विमानांची वाहतूक व्यवस्था मुंबईत करण्याची इच्छा अपुरी राहिली आहे. त्यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार असल्याचेही गडकरींनी सांगितले. गंगा नदीतून जलमार्ग सुरू झाला आहे, आणि अशाच प्रकारचे प्रयोग आता देशभरात होत आहेत.
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | दोन भाऊ काही कारणांनी वेगळे झाले म्हणून नातं तुटत नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
इंधनाचे नवे पर्याय शोधण्याची आवश्यकता -
सध्या राज्यातील साखर कारखाने संकटात आहे. त्यामुळे साखर कारखाने वाचवायचे असतीन तर इथेनॉल आणि मिथेनॉल विक्रीस सुरुवात करायला हवी. गडचिरोली सारख्या भागात बायोडिझेल तयार करू शकतो. हे डिझेल स्वस्त असून याला जगात मान्यता आहे. हे डिझेल आत्तापर्यंत यायला हवे होते. मात्र, तसं घडलं नाही. त्यामुळे आगामी काळात त्यावर काम करण्याचंही गडकरींनी सांगितले.
मुंबईतील सिव्हेजवर ट्रिटमेंट करुन उर्जा निर्माण करता येऊ शकते. नागपूरमध्ये आम्ही हा प्रयोग केला आहे. सोलार उर्जेचाही वापर वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. मुंबईच्या दळणवळण क्षेत्रात आता मेट्रो येत आहे. यात आम्ही खाली रोड आणि वरती मेट्रो, अशी कल्पना आहे. असा प्रयोग आम्ही नागपूरमध्ये केला आहे. हवाई वाहतूक मुंबईसाठी खूप फायदेशी आहे. आगामी काळात त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही गडकरी म्हणाले.
Electric Bus | मुंबई ते पुणे धावणार देशातील पहिली इलेक्ट्रिक बस, नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement