मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
Rohit Pawar on Praful Patel : VSR कंपनीच्या मालकाचा मुलाच्या लग्नाला आपण गेला होतात का? असा सवाल रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना केलाय.
Rohit Pawar on Praful Patel : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला होता. यानंतर अजित पवार (Ajit Pawar) प्रवास करत असलेल्या व्हीएसआर कंपनीची विमाने सदोष असल्याचा आरोप करत आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी या कंपनीविरोधात रान उठवले होते. या पार्श्वभूमीवर गुरुवारी व्हीएसआर कंपनीचे मालक आर.के. सिंला सीआयडीने (CID) चौकशीसाठी बोलावले होते. तसेच जय पवार यांनी आर.के. सिंगचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. अशातच आता आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सवाल केले आहेत. VSR कंपनीच्या मालकाचा मुलाच्या लग्नाला आपण गेला होतात का? असा सवाल रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना केलाय.
नेमकं काय म्हणाले रोहित पवार?
मिस्टर प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या. उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा..! असे ट्वीट करत रोहित पवार यांनी सवाल उपस्थित केले आहेत. आता रोहित पवार यांच्या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
Mr. प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 7, 2026
जय पवारांनी रोहित सिंहच्या अटकेची मागणी केली आहे
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आता एक महिन्याहून अधिकचा काळ उलटून गेला आहे. अलीकडेच अजितदादांच्या अपघाताचा चौकशीचा अहवाल समोर आला आहे. यांनतर अजित पवारांचे पूत्र जय पवार यांनी अहवालावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर जय पवार यांनी व्हीएसआर कंपनीचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आणला आहे. व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह यांचा एक व्हिडीओ जय पवारांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यात रोहित सिंह हा विमान हवेत असताना पायलट सीटवर बसून झोपा काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत जय पवारांनी रोहित सिंहच्या अटकेची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या:
NCP : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणबाबत पटेल, तटकरेंना माहिती होती,शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा दावा, अजितदादांसोबतच्या बैठकीचा दाखला दिला
महत्त्वाच्या बातम्या




















