एक्स्प्लोर
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | शिवसेनेकडून लिहून घेतल्याच्या वक्तव्याचा माध्यमांकडून विपर्यास : अशोक चव्हाण
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज पार पडत आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आपलं व्हिजन मांडलं.

मुंबई : हा देश घटनेच्या चौकटीत चालला पाहिजे, असं मत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात मांडलं. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या कमी करणे, गुतवणूकदार येतील यासाठी राज्यात पायाभूत सुविधा वाढवणे, रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणे आणि सामाजिक सलोखा वाढवणे, हाच आगामी पाच वर्षातील महाविकासआघाडीचा अजेंडा असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले. यावेळी शिवसेनेकडून लिहून घेतल्याच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात संत्तांतर झालं आणि एक नवी आघाडी उदयास आली. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. आता या सरकारचं महाराष्ट्राच्या विकासाप्रती काय व्हिजन आहे? त्याचबरोबर सरकारला त्यांच्या कार्याची जाण करुन देणाऱ्या विरोधकांची भूमिका काय आहे? हे जाणून घेण्यासाठी एबीपी माझाचा खास उपक्रम माझा महाराष्ट्र माझं व्हिजन हा कार्यक्रम आज पार पडत आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, अशोक चव्हाण, जितेंद्र आव्हाड, प्रकाश आंबेडकर, चंद्रकांत पाटील, अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील आणि आदित्य ठाकरे या नेत्यांनी यात सहभाग घेतला.
शिवसेनेकडून लिहून घेतल्याच्या वक्तव्याचा विपर्यास - चव्हाण
तीन पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेली महाविकासआघाडीचं हे सरकार आहे. त्यामुळे आम्ही आमच्यात कॉमन मिनिमम प्रोग्रॅम आखला आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थही असाच होता. मात्र, माझ्या या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केल्याचं अशोक चव्हाण यांनी सांगितले.
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | दोन भाऊ काही कारणांनी वेगळे झाले म्हणून नातं तुटत नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करणं हाच आमचा अजेंडा : चव्हाण
मागच्या काळात विकासाचा अजेंडा किती राबण्यात आला हा एक प्रश्नच आहे? मात्र, महाविकास आघाडीचा अजेंडा हा विकासाचा आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या कमी करणे हे आमचं उदिष्ट आहे. आमच्या यापूर्वीच्या काळात आत्महत्या झाल्यात. मात्र, मागच्या पाच वर्षात या आत्महत्या वाढल्या आहेत. यात मराठवाडा आणि विदर्भात याचं प्रमाण अधिक आहे. आत्महत्या झाल्यानंतर मागे राहिलेल्या कुटुंबाला मदत करणं गरजेचं आहे. आत्महत्यग्रस्त कुटुंबांच्या मागे सरकारने उभं राहायला हवं. यासाठी सरकार, सामाजिक संस्था या सर्वांनी यासाठी काम करायला हवे, असल्याचं अशोक चव्हाण म्हणाले.
‘जेव्हा तुमच्या चौकशा सुरु होतील तेव्हा रडू नका’, वृक्षलागवडीवरुन मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा
रोजगार निर्मितीचं आव्हान -
मागील पाच वर्षात 10 कोटी इतकी रोजगार निर्मिती अपेक्षित होती. मात्र, त्याप्रमाणात रोजगार निर्मिती झाली नाही. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज आहे. सध्या देशात आणि राज्यात रोजगार निर्मितीची आवश्यकता आहे. त्यासाठी महाराष्ट्रात गुंतवणूक येण्यासाठी प्रयत्न करायला हवे. यासाठीच सामाजिक सलोखा राखणं महत्वाचं आहे. कारण, सामाजिक सलोखा राखला तरच राज्यात गुतवणूकदार गुंतवणूक करतील. राज्याचे आणि केंद्राचे संबंध चांगले असावेत. एएनआय राज्याकडून तपास घेतला. केंद्राने असं करण्याच्या आधी विचार करायला हवा होता. राज्य सरकारशी चर्चा करायला हवी होती. कारण, राज्य आणि केंद्राचे संबंध चांगले राहिले तरच राज्याचा विकास होण्यास मदत होईल, असं मत चव्हाण यांनी मांडले.
#माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन | नाणार प्रकल्प आणायचा असेल तर स्थानिकांचा विचार गरजेचा : सुभाष देसाई
पिकविमा कंपनींचा प्रश्न निकाली लावणार
पिकविमा हा विषय चंद्रकांत पाटील यांनी काढला. मात्र, पिकविमाचे पैसे नेमके मिळाले कोणाला? हा संशोधनाचा प्रश्न असल्याचा टोला अशोक चव्हाण यांनी भाजप नेते चंद्रकांता पाटील यांना लगावला. आता शेतकरी पिकविमा भरत नाही. कारण, आपल्याला नुकसान भरपाई मिळेल की नाही, अशी शंका त्यांच्या मनात आहे. त्यामुळे शेतकरी आणि पिकविमा कंपन्या यांच्या अडचणी सोडवण्याची गरज असल्याचे चव्हाण यांनी बोलून दाखवले.
राज्यात रस्त्याचा विकास हा पायाभूत सुविधेचा भाग आहे. मात्र, मागील पाच वर्षात ज्याप्रमाणात शब्द दिला गेला त्याप्रमाणात कामे झाले नाही. पहिल्या तीन वर्षात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात खूप चांगली कामे झाली. मात्र, आताच्या काही दिवसांमध्ये ही कामे बंद पडलेली दिसत आहेत. बांधा आणि हंस्तातरीत करा, हा निर्णय भाजप सरकारने घेतलाय. मात्र, हा निर्णय म्हणावा, तसा चालला नाही. यांसदर्भात मी नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
UNCUT | अशोक आणि अमिता चव्हाण यांच्या लव्हस्टोरीचे अनोखे किस्से | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
