एक्स्प्लोर
मंत्रालयाच्या गेटवर डाळ-कांदा फेकला

मुंबई: बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयाच्या गेटबाहेर आंदोलन केलं.
कर्जमाफी, शेतकऱ्यांकडील पूर्ण तुरीची खरेदी करावी, तसंच शेतमालाला योग्य हमी भाव मिळावा, या मागणीसाठी बळीराजा संघटनेचे कार्यकत्यांनी जोरदार आंदोलन केलं.
तुरीची डाळ, कांदे आणि केळी फेकून आंदोलकांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.
दरम्यान पोलिसांनी तात्काळ धाव घेत आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.
एकीकडे शेतकऱ्यांकडील तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत, खरेदी केंद्राबाहेर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे विरोधकांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेद्वारे महाराष्ट्र पिंजून काढला आहे. त्यातच आता गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चहूबाजूंनी संकटात सापडला आहे.
अशा परिस्थितीत सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी भावना शेतकरी संघटनांकडून होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेने आपला संताप थेट मंत्रालयाच्या आवारात डाळ, कांदा फेकून व्यक्त केला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नाशिक
बातम्या
सांगली
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
