एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Live : उद्धव ठाकरेंचा शब्द न शब्द जसाच्या तसा... वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडावर आज उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली असून थेट जनतेशी संवाद साधला.


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं.... आजच मुख्यमंत्रीपद सोडतो असं ते म्हणाले. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

माझी कोविड टेस्ट पॉझिटीव्ह असल्याने माझा चेहरा असा आहे. आता शिवसेनेवर आलेल्या संकटामुळे माझा चेहरा असा झाला असं काहीजण बोलतील. कोरोना काळा बाका होता, त्यावेळी आपण लढलोय. अशा कठीण काळात प्रशासन माहिती नसलेल्या माणसाच्या वाट्याला अनेक गोष्टी आल्या.... पण मी प्रामाणिकपणे काम केलं. त्यामुळे देशातल्या टॉप पाच मुख्यमंत्र्यामध्ये समावेश माझा समावेश झाला. 

आता वेगळा मुद्दा...मुख्यमंत्री भेटत नव्हते असं अनेकजण तक्रार करतात. मी भेटत नव्हतो, कारण शस्त्रक्रिया झालेली होती. तो अनुभव वेगळा, त्यामुळे भेटणं शक्य नव्हतं. ...पण काम झालं. 
शिवसेना आणि हिंदुत्व एकच, कधीही वेगवेगळे नाही. हिदुत्व हा आमचा श्वास, अयोध्येला शिवसैनिक गेले. हिंदुत्वाबद्द्ल बोलणारा विधानसभेत बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री. काहीजण म्हणतात बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही. ... पण आता काय वेगळं झालं....बाळासाहेबांचा विचार मी पुढे नेतोय. मधल्या काळात जे काही मिळालं ते बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेनं दिलं,,, ते लक्षात ठेवा

आताच्या परिस्थितीच्या खोलात मला जायचं नाही....विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर मी चर्चा केली, आपली माणसं आपल्याला एकत्र ठेवावीत लागली ... ही कुठली लोकशाही, मला पटत नाही

मला कसलाही अनुभव नाही, पण प्रामाणिकपणे, जिद्दीने काम करणार. गेली 25 -30 वर्षे काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात लढलो. पण परिस्थिती अशी आली की त्यांच्यासोबत जावं लागलं.... पवार साहेबांनी सांगितलं की जबाबदारी तुला घ्यावी लागेल
पवारसाहेबांनी विश्वास टाकला, सोनियांनी विश्वास टाकला. मग कोणताही अनुभव नसताना मी जबाबदारी घेतली.....प्रशासन सांभाळत सर्व कामं केली

मला आज दु:ख झालं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाले म्हणाले असते की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसावेत, तर समजून घेतलं असतं. हा त्यांचा प्रश्न आहे. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं....सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन सांगावं.... तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको,,, असं तोंडावर सांगावं

माझ्या सहकाऱ्यांनी तिकडे जाऊन बोलण्यापेक्षा तोंडावर सांगावं.... आजच मुख्यमंत्रीपद सोडतो. आज राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवतो... जे आमदार गायब आहेत त्यांनी यावं आणि ते पत्र घेऊन जावं. ही लाचारी नाही, मजबूरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसैनिक आहेत... तोपर्यंत मी कोणतेही आव्हान स्वीकारेन.... 

ज्या शिवसैनिकांना वाटतंय की मी पक्षप्रमुख म्हणून नालायक आहे.... ते सांगावं ,,, हेही पद सोडेन. मी मुख्यमंत्रीपदी असल्याने जर कुणाला अडचण असेल तर मी मुख्यमंत्रीपद सोडणार.... माझ्यानंतर जर कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होणार असेल तर मला आनंद आहे....

गायब आमदारांनी माझं हे लाईव्ह पाहावं... आणि मला सांगावं... मी पद सोडेन,,,,, तोंडावर सांगाव. मी ज्यांना माझे मानतो, त्यापैकी कितीजण तिकडे गेले..... त्यापैकी एकानेही माझ्याविरोधात मत केलं तर ते माझ्यासाठी लाजीरवाणे असेल. त्यामुळे त्यांच्यापैकी एकानेही सांगितलं की तुम्ही राजीनामा द्या, मी तयार आहे. 

एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda : जयंत पाटील म्हणाले, चांगला नट तरी घ्यायचा, मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्यापेक्षा गोविंदा चांगलाच नट!
जयंत पाटील म्हणाले, चांगला नट तरी घ्यायचा, मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्यापेक्षा गोविंदा चांगलाच नट!
Govinda Ahuja Joins Shiv Sena : CM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने हार्दिकला सुनावले; जिव्हारी लागणारे शब्द बोलले
मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने हार्दिकला सुनावले; जिव्हारी लागणारे शब्द बोलले
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Raut - Nana Patole : सांगलीच्या जागेवरून मविआत वाद ?Anandrao Adsul : चोर रात्रीच्या अंधारातच घाई - गडबडीने येतात - आनंदराव अडसूळTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 28 March 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 28  मार्च 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda : जयंत पाटील म्हणाले, चांगला नट तरी घ्यायचा, मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्यापेक्षा गोविंदा चांगलाच नट!
जयंत पाटील म्हणाले, चांगला नट तरी घ्यायचा, मुख्यमंत्री म्हणाले, तुमच्यापेक्षा गोविंदा चांगलाच नट!
Govinda Ahuja Joins Shiv Sena : CM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने हार्दिकला सुनावले; जिव्हारी लागणारे शब्द बोलले
मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर इरफान पठाणने हार्दिकला सुनावले; जिव्हारी लागणारे शब्द बोलले
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Aishwarya Abhishek on Aradhya Bachchan : बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
Embed widget