Top 10 Maharashtra Marathi News : सकाळच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर; स्मार्ट बुलेटिन : 20 ऑक्टोबर 2022 : गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...
1. दिवाळीला एक दिवस उरला असताना अनेक लाभार्थी 100 रुपयाच्या किटच्या प्रतीक्षेत, तर काही जिल्ह्यात जिन्नस आणि पिशव्यांअभावी वितरण रखडलं
2. पीकविम्याच्या ऑनलाईन अर्जासाठी नियमांनुसार 72 तासांची मुदत, मात्र सर्व्हर डाऊन, अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसमोर नवीन संकट
3. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा रद्द होण्याची शक्यता, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या निर्णयाकडे लक्ष
4. एमसीए निवडणुकीच्या पूर्वसंध्येला पवार, शिंदे आणि फडणवीस एकाच मंचावर, कार्यक्रमानंतर अजित पवार-फडणवीसांची खलबतं, तर पवार-नार्वेकरांचा एकाच कारने प्रवास
5. मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीसाठी आज मतदान, अमोल काळे आणि संदिप पाटील रिंगणात
आज मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक (Mumbai Cricket Association Election) होत आहे. यासाठी 380 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निमित्तानं महाराष्ट्रातील राजकारणी एकाच मंचावर आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांचा पॅनल एकत्र निवडणूक लढवत आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 20 ऑक्टोबर 2022 : गुरुवार
6. रितेश-जिनेलियाच्या देश अॅग्रोवर इतरांना डावलून एमआयडीसी भूखंड आणि जिल्हा बँकेचं कर्ज मिळवल्याचा आरोप, मात्र रितेशकडून आरोपांचं खंडन
लातूर येथील नियोजित देश अॅग्रो प्रा. लि. सदर्भात जो भूखंड देण्यात आला आहे तो नियमानुसारच असल्याचा खुलासा कंपनीकडून करण्यात आला आहे. या कंपनीसंबंधी आज काहीजणांकडून आक्षेप घेण्यात आले होते, ते वस्तुस्थितीवर आधारित नसल्याचं कंपनीच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. देश अॅग्रोचे प्रवर्तक रितेश (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख (Genelia Deshmukh) यांच्याबाबत गैरसमज निर्माण होऊ, यासाठी हा खुलासा करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
7. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या परवानगीशिवाय मुंबईत फटाके विकता येणार नाहीत, आदेश जारी
8. दिवाळीची खरेदी 20 टक्क्यांनी महागली, फटाके, फराळ, पणत्यांचे दर वाढले, तर जानेवारीनंतर देशभरात दूधटंचाईची दाट शक्यता, लम्पी आणि चारा टंचाईमुळे दूध संकलन घटण्याची शक्यता
9. वाढत्या महागाईविरोधात फ्रान्समध्ये जनता रस्त्यावर, इंधनटंचाईमुळे रशियावरचे निर्बंध मागे घेण्याची मागणी
10. युक्रेन सोडा, भारतीयांना महत्त्वाची सूचना, रशिया आणि युक्रेनमधलं युद्ध पुन्हा भडकल्यानं केंद्र सरकार अलर्ट मोडवर