Eknath Shinde Holi 2025 : एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धुळवड, नातावासह उपमुख्यमंत्र्यांची मजामस्ती
Rang Panchami : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 2025 च्या होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. उद्यापासून म्हणजे 12 मार्च ते 18 मार्च 2025 पर्यंत हे नियम लागू राहणार आहेत. रमजानचा महिना लक्षात घेऊन ही खबरदारी घेण्यात आली आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर नेमके काय आहेत नियम? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी नवीन नियमावली काय?
1. अश्लील शब्द किंवा घोषणांचे सार्वजनिक उच्चारण किंवा अश्लील गाणी गाणे.
2. हावभाव किंवा नक्कलचा वापर आणि चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू किंवा गोष्टींचे, प्रदर्शन किंवा प्रसार करणे ज्यामुळे कोणाचीही प्रतिष्ठा, सभ्यता किंवा नैतिकता दुखावते.
3. पादचाऱ्यांवर रंगीत पाणी, रंग किंवा पावडर फवारणे किंवा फेकणे याच्यावर होणार कारवाई
4. रंगीत किंवा साध्या पाण्याने किंवा कोणत्याही द्रवाने भरलेले फुगे तयार करणे आणि/किंवा फेकणे.
5. होळी व रंगपंमी निमित्त जबरदस्ती वर्गणी मागणार्यांवरही होणार कारवाई
मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून एक प्रसिद्ध पत्रक जारी
मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडून नुकतचं एक प्रसिद्ध पत्रक जारी करण्यात आले आहे. यात होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीसाठी मुंबई पोलिसांनी नियमावली जारी केली आहे. यानुसार, अश्लील शब्दातील गाणी गाण्यांवर प्रतिबंध असणार आहे. तसेच अनोळखी लोकांवर रंग किंवा पाणी फेकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यासोबतच समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य करू नये, अशी सूचना मुंबई पोलिसांनी दिली आहे. रमजानचा महिना सुरू असल्याने मुंबई पोलिसाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी सण 12 मार्च 2025 ते १८ मार्च 2025 या कालावधीत साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन घडू नये यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. सार्वजनिक ठिकाणी अंधाधुंदपणे रंगीत पाणी शिंपडणे आणि अश्लील बोलणे यामुळे जातीय तणाव आणि सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असते. मी सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी येथे नमूद केलेल्या काही कृत्यांना प्रतिबंधित करणे आवश्यक मानतो. त्यानुसार, पोलीस उपआयुक्त अकबर पठाण यांनी काही नियमावली जारी केली आहेत.























