एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दारु कंपन्यांचं पाणी बंद करणं अयोग्य : पंकजा मुंडे
बीड : दुष्काळी मराठवाड्यात पाण्याचं प्रचंड दुर्भिक्ष्य असताना, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अजब वक्तव्य केलं आहे. "दारु किंवा उद्योगधंद्याना देण्यात येणारं पाणी हे आरक्षित केलेलं असतं. त्यामुळे अशा उद्योगांचं पाणी बंद करणं अयोग्य होईल. त्यांना जर पिण्याचं पाणी देण्यात येत असेल तर बंद करावं", असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे. त्या बीडमध्ये बोलत होत्या.
दारु कंपनी किंवा उद्योग कंपन्यांवर चालणारी अनेक पोटं आहेत. जर या कंपन्या बंद पडल्या तर अनेकांवर उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे हे पाणी बंद करणं चुकीचं ठरेल, असं पंकजा यांनी नमूद केलं.
मात्र मराठवाड्यात माणसांना पिण्यासाठी पाणी नाही. लातुरसारख्या भागात तर रेल्वेने पाणी पुरवलं जात आहे. पाण्यासाठी अनेकांचे जीव गेले आहेत. असं सगळं घडत असताना पंकजा मुंडे यांनी मात्र कंपन्यांना देण्यात येणारं पाणी आरक्षित असल्यामुळे, ते लोकांना पिण्यासाठी देणं अयोग्य असल्याचंच अप्रत्यक्षरित्या म्हटलं आहे.
त्यामुळे पंकजा मुंडे यांना लोकांना पिण्यासाठी पाण्यापेक्षा, दारु किंवा तत्सम उद्योगधंद्याना पाणी जास्त आवश्यक असल्याचं वाटतं की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement