एक्स्प्लोर

पालघरमधील धरणं, तलाव, धबधब्यांत उतरण्यास 6 सप्टेंबरपर्यंत मनाई

पावसामुळे पालघरमध्ये वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे आणि त्यामध्ये पोहणे, धबधब्यावर जाणे किंवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे यास 6 सप्टेंबरपर्यंत मनाई करण्यात आली आहे.

पालघर : पावसाळ्यामध्ये धबधबे, धरण, तलाव किंवा नदी परिसरात फिरायला जाण्याचा अनेकांचा प्लॅन असतो. वीकेंडला अनेक जण सहकुटुंब किंवा मित्र मंडळींसोबत वर्षासहलीचे बेत आखतात. मात्र पालघरमध्ये तुम्ही धबधबे किंवा धरणावर पिकनिकला जाण्याचा विचार करत असाल, तर आणखी दोन महिने तुम्हाला थांबावं लागणार आहे. धबधबे, धरणात उतरण्यास 6 सप्टेंबर 2019 पर्यंत मनाई करण्यात आली आहे. कोणकोणत्या धबधबे, तलाव आणि धरणांचा समावेश 1) काळमांढवी धबधबा, केळीचा पाडा, ता. जव्हार 2) हिरडपाडा धबधबा, ता. जव्हार 3) दाभोसा धबधबा, ता. जव्हार 4) डोम विहीरा खडखड धरण, ता. जव्हार 5) पळूचा धबधबा, साखरा, ता. विक्रमगड 6) वाघोबा खिंड धबधबा, ता. पालघर 7) एैना दाभोण धबधबा, बोईसर 8) पडघा, बोईसर धबधबा 9) देवखोप धरण, पालघर 10) तांदुळवाडी धबधबा, सफाळा, ता. पालघर 11) झांझरोळी धरण, केळवा रोड पूर्व, ता. पालघर 12) चिंचोटी धबधबा, वसई 13) तुंगारेश्वर धबधबा, वसई 14) वांद्री धरण, गांजे ढेकाळे, ता. पालघर 15) तिळमाळचा धबधबा, वडपाडा परळी, ता. वाडा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 (C) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पालघर जिल्हयातील 15 धबधबे, तलाव किंवा धरणांच्या सभोवताली एक किलोमीटर परिसरात 10 जुलै 2019 ते 6 सप्टेंबर 2019 या कालावधीमध्ये खालील गोष्टींसाठी मनाई आदेश लागू करण्यात येत आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत कळवलं आहे. धबधबा-धरणांवर काय करण्यास मनाई? 1. पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे, खोल पाण्यात उतरणे आणि त्यामध्ये पोहणे 2. धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे. 3. पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे, धबधबे, दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे अशा ठिकाणी सेल्फी काढणे किंवा कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरण करणे 4. पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याचे परिसरामध्ये मद्यपान करणे किंवा मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतूक करणे, अनधिकृत मद्य विक्री करणे आणि उघड्यावर मद्य सेवन करणे 5. वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबवणे 6. वाहन अतिवेगाने चालवणे तसेच वाहतुकीस परिणाम होईल अशा प्रकारे वाहने चालवणे 7. वाहनांची ने-आण करताना बेदरकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे 8. सार्वजनिक ठिकाणी खाद्यपदार्थ, कचरा, काचेच्या आणि प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकॉल आणि प्लास्टिकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे 9. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगलटवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य आणि अश्लील हावभाव करणे, शेरेबाजी करणे किंवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे 10. सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगीत यंत्रणा वाजवणे, डीजे सिस्टम वाजवणे, गाडीमधील स्पीकर, उफर वाजवणे आणि त्यामुळे ध्वनी प्रदूषण करणे 11. ज्या कृतीमुळे ध्वनी, वायू आणि जल प्रदूषण होईल अशी कोणतीही कृती करणे 12. धबधब्याच्या एक किमी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी आणि सहा चाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात येत आहे (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) मनाईच्या आदेशाचा भंग केल्यास संबंधितांविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 (ब) नुसार कारवाई करण्यात येईल. मनाई आदेशात नमूद केलेल्या ठिकाणी व्यक्ती, संस्था यांच्याकडून चित्रिकरण, सामाजिक उपक्रम/कार्यक्रम इत्यादींसाठी संबंधित विभागाकडून पूर्व परवानगी घेतलेल्या कार्यक्रमांना लागू असणार नाहीत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Cabinet Expansion :मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा,14 तारखेला मंत्रिमंडळ मिळणार?Kurla Special Report  : कुर्ला अपघातात मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या लंपास Video ViralKalyan Durgadi Malanggad Special Report : आनंद दिघे धर्मवीर कसे झाले?काय आहे मलंगगड दुर्गाडीची मोहीमParbhani : आंदोलक बेलगाम, निष्पापांची होरपळ; व्यावसायिकांचं हजारोंचं नुकसान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
मोठी बातमी : सोलापूरमध्ये 3 सरपंचांसह 14 ग्रामपंचायत सदस्यांवर अपात्रतेची कारवाई, जिल्हाधकाऱ्यांचा मोठा निर्णय
Nawab Malik : समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांना अटक होणार? तपास चार आठवड्यात पूर्ण करण्याची पोलिसांची हमी
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवणार, एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
Kurla Bus Accident: अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे बसमधून कसा बाहेर पडला? 'तो' व्हिडीओ व्हायरल
अपघातानंतर बेस्टचालक संजय मोरे 'त्या' दोन बॅग घेऊनच आरामात बाहेर पडला, VIDEO व्हायरल
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
साडे तीन कोटींच्या चरससह डिलरला अटक, गावठी कट्टाही जप्त; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
Embed widget