एक्स्प्लोर

MNS Vardhapan Din 2026 : रायगडाच्या पायथ्याशी मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ, राज ठाकरे म्हणाले, 'हजारो लोकांना आपल्या पक्षाचा सदस्य व्हायचंय, मनसैनिकांनी...

MNS Vardhapan Din 2026 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20 वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

MNS Vardhapan Din 2026 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS Vardhapan Din 2026) 20 वा वर्धापन दिन किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) आणि पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांच्यासह सहकुटुंब या सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यांनी रोपवेद्वारे रायगडावर पोहोचून छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि अभिवादन केले. यावेळी मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. राज ठाकरे यांनी भाषण करताना महाराष्ट्रातील मनसैनिकांना आवाहन केले आहे. 

राज ठाकरे म्हणाले की, यावर्षी मी ठरवले की, नऊ तारखेला वर्धापन दिन आहे आणि 19 तारखेला गुढीपाडव्याचा मेळावा आहे. त्यामुळे दोन वेळेस बोलण्यापेक्षा जे काही बोलायचे आहे ते 19 तारखेला एकदाच बोलून टाकू. त्यामुळे आम्ही ठरवले की, पक्ष सदस्य नोंदणी बऱ्याच दिवसांपासून करायची होती. त्यामुळे मनसेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पक्ष सदस्य नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आज महाराष्ट्रातल्या सर्व सैनिकांना माझं आवाहन आहे की, अनेक लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे. नुसते सदस्य नाही तर त्यांना सक्रिय सदस्य व्हायचं आहे. त्यामुळे ज्या ज्या वर्दळीच्या जागा आहेत, त्या सर्व ठिकाणी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स लागली पाहिजेत. तुम्ही लोकांपर्यंत गेले पाहिजे. लोकांशी बोलले पाहिजे. हजारो लोकांना आपल्या पक्षाचे सदस्य व्हायचे आहे. त्यांना तुम्ही सदस्य करून घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी मनसैनिकांना केले. 

MNS Vardhapan Din 2026 : रायगडावर पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात

राज ठाकरे पुढे म्हणाले की, आज महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावर पक्षाच्या सदस्य नोंदणीची सुरुवात आपण करत आहोत. महाराजांचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही जा. येत्या 19 तारखेला माझा जो महाराष्ट्र सैनिक आहे, जे महाराष्ट्राचे हितचिंतक आहेत, त्यांनी सर्वांनी गुलाल उधळत शिवतीर्थावर यावे. सदस्य नोंदणीच्या उपक्रमाला सुरुवात झाली असे मी जाहीर करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Raj Thackeray : राज ठाकरे मनसेच्या वर्धापनदिनी किल्ले रायगडावर, अमित ठाकरेंना कुत्रा दिसताच आगतस्वागत सोडून प्रेमाने जवळ घेतलं बिस्कीट खाऊ घातलं

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NCP Sangli News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षांतर्गत संघर्ष उफाळला; 35 पदाधिकाऱ्यांनी शहर जिल्हाध्यक्षांकडे दिले राजीनामे, नेमकं प्रकरण काय?
Ratnagiri Bauxite Mining Project: बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
Vijay Wadettiwar on Navneet Rana: 'नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली', विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका, 'हिरवे साप' म्हणत राणांचा पलटवार
'नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली', विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका, 'हिरवे साप' म्हणत राणांचा पलटवार
Anil Parab : मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Embed widget