एक्स्प्लोर

अर्थसंकल्पावर शरद पवारांचा राज्य सरकारला एकच प्रश्न, 70 रुपयांचे उदाहरण देत रोखठोक प्रतिक्रिया!

शरद पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली. प्रत्यक्षात न येणाऱ्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.

कोल्हापूर : राज्य सरकारने आपला अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2024) 28 जून रोजी सादर केला. या अर्थसंकल्पात राज्य सरकारने अनेक आकर्षक घोषणा केल्या. विशेष म्हणजे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महिला, तरुण, शेतकरी यांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या अर्थसंकल्पावर विरोधकांनी सडकून टीका केली आहे. अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पोकळ घोषणा केल्या आहेत, असा दावा विरोधकांनी केलाय. त्यानंतर आता खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनीदेखील या अर्थसंकल्पावर भाष्य केलं आहे. खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? असे शरद पवार म्हणाले. 

खिशात 70 रुपये असताना....

शरद पवार हे कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी अर्थसंकल्पतील गोष्टी बाहेर आल्या होत्या. विधानसभेची निवडणूक लक्षात घेऊन हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे.  प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टी अर्थसंकल्पात आहेत, असे शरद पवार म्हणाले. विशेष म्हणजे खिशात 70 रुपये असताना 100 रुपये खर्च कसे करणार? असा खोचक सवालही शरद पवार यांनीक केला. 

विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणेच चित्र असेल

पुढ बोलताना शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव यावरही प्रतिक्रिया दिली. लोकसभा निवडणुकीत आम्ही 48 पैकी 31 जागा जिंकल्या. सरकारने आमचा धसका घेतला आहे. मोदींनी राज्यात 18 सभा घेतल्या. पण सभा घेतलेल्या 14 ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला.  मोदीच्या कामावर जनता खुश नाही, असे शरद पवार म्हणाले. 

आणीबाणीचा विषय काढणे योग्य नव्हते

तसेच, लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीचेही चित्र असेल. आमच्या आघाडीत सामूहिक नेतृत्व असेल. सध्या चालू असलेल्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेच्या अध्यक्षांनी आणीबाणीचा उल्लेख केला होता. यावरही शरद पवार यांनी भाष्य केले. लोकसभा अध्यक्षांच्या भाषणातील तो भाग त्यांच्या पदाच्या प्रतिष्ठेला शोभणारा नव्हता. आणीबाणीचा विषय काढण्याची गरज नव्हती. त्या विषयाला आता 50 वर्षे झाली आहेत. इंदिरा गांधी यांनी त्याविषयी दिलगीरीही व्यक्त केली होती. तो विषय काढणे योग्य नव्हते, असे शरद पवार म्हणाले. 

हेही वाचा :

Maharashtra Budget 2024 : राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस, छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर

''फडणवीसांच्या भाषेत बोलायचं तर, खोटं नेरेटिव्ह पसरवणारं बजेट; अर्थसंकल्पावर ठाकरेस्टाईल टोला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Joe Biden : ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
''अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला मागणं
''अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला मागणं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं निलंबन मागे घेण्याची शक्यताMaharashtra Assembly Session : दानवेंंचं निलंबन ते मुंबईतील पाणीपुरवठा; विधानसभेत काय काय घडलं?Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 03 July 2024Ambadas Danve Mumbai : विधान परिषदेतील आक्षेपार्ह वक्तव्यावरून अंबादास दानवेंची दिलगीरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
हार्दिक पांड्याचा पराक्रम, अष्टपैलू खेळाडूमध्ये पटकावलं अव्वल स्थान
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
''आम्ही लाडक्या भावांचाही निर्णय घेतला; महिन्याला 10 हजार देतोय''; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
Joe Biden : ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
ज्यो बायडेन यांचा पहिल्याच चर्चेत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम; राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीवर सुद्धा टांगती तलवार
''अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला मागणं
''अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावे, मी मंत्री व्हावे''; विजय शिवतारेंचं पांडुरंगाला मागणं
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई - एकनाथ शिंदे
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी पैशांची मागणी केल्यास कारवाई - एकनाथ शिंदे
लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात कारवाईचे सत्र
लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांची आर्थिक लुट; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अकोला,अमरावतीसह बुलढाण्यात कारवाईचे सत्र
Vidhan Parishad Election : मविआला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज, जुळवाजुळव कशी करणार? कुणाचे आमदार फुटणार? 
मविआला चार तर महायुतीला सहा अतिरिक्त मतांची गरज, जुळवाजुळव कशी करणार? कुणाचे आमदार फुटणार? 
Astronaut Sunita Williams : भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स अंतराळात का अडकून पडल्या? आतापर्यंत काय काय घडलं अन् परतीचा प्रवास कसा असणार??
Embed widget