Mira Road Tension: मीरारोड प्रकरणी आतापर्यंत 15 जणांना अटक, नितेश राणे आज मीरा रोडला जाणार
सीसीटिव्ही फूटेज तापसल्यानंतर आणखी लोकांवर कारवाई होणार असून अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
ठाणे : भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आज मीरा रोडला (Mira Road) जाणार आहे. मीरा रोडमध्ये झालेल्या वादामुळं नितेश राणे संध्याकाळी मीरा रोडला जाणार आहे. स्वत:नितेश राणेंनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. मीरा भाईंदरप्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सीसीटिव्ही फूटेज तापसल्यानंतर आणखी लोकांवर कारवाई होणार असून अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मीरा रोडच्या नया नगर परिसरात रविवारी (21 जानेवारी) रात्री साडेअकराच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणात स्थानिक पोलिसांनी 15 जणांना अटक केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर नया नगर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच बॅरिकेडिंगच्या माध्यमातून पोलीस प्रत्येक वाहनावर लक्ष ठेवून आहेत. सध्या मीरा रोड परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सरनाईकांची 25 जानेवारीला मिरा भाईंदर बंदची हाक
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेऊन, नया नगर परिसरात कोम्बिंग ऑपरेशन करण्याची आणि सर्व आरोपींना 48 तासांत अटक करण्याची मागणी केली आहे. मिरा भाईंदर शहरात जातीय तणाव निर्माण करण्याचा कुणाचा तरी प्रयत्न असल्याचा सरनाईकांचा आरोप आहे. या प्रकरणातल्या आरोपींनी वेळेत अटक झाली नाही तर सरनाईकांनी 25 जानेवारीला मिरा भाईंदर बंदची हाक दिली आहे.
उद्या मीरा रोड..
— nitesh rane (@NiteshNRane) January 22, 2024
भेटू मग..
जय श्री राम 🚩
कडक कारवाई करणार
मीरा भाईंदरप्रकरणी आतापर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सीसीटिव्ही फूटेज तापसल्यानंतर आणखी लोकांवर कारवाई होणार आहे. तर कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाही. तसेच या प्रकरणी अंत्यत कडक कारवाई केली जाणार आहे. अवैध बांधकाम व धंदे असेल ते बंद होईल, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
लोकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता पुन्हा तणाव निर्माण होऊ नये यासाठी परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवा लक्षात घेता हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हे ही वाचा :