Shirdi : 31 डिसेंबरला शिर्डीच्या साईबाबांचं मंदिर बंद राहणार, साईसंस्थानाचा निर्णय
31 डिसेंबरला शिर्डीच्या साईबाबांचं मंदिर बंद राहणार आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर साईसंस्थानाने हा निर्णय घेतला आहे.
शिर्डी : शिर्डीच्या साईबाबांचं मंदिर 31 डिसेंबरला बंद राहणार आहे. नव्या वर्षात लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर साईसंस्थानाने हा निर्णय घेतलाय. 1 जानेवारीला सकाळी सहा वाजता शिर्डीचं साई मंदिर उघडणार आहे.
दरवर्षी 31 डिसेंबरच्या भक्तांच्या सोयीसाठी रात्रभर साईमंदिर खुले ठेवले जाते. यावर्षी मात्र निर्बंधामुळे साईमंदिर राहणार बंद राहणार आहे. साईमंदिर प्रशासनाने प्रसिद्धी पत्रक काढून निर्णय जाहीर केला आहे. तसेच पहाटेची काकड आरती व शेजारतीमध्ये भाविकांना प्रवेश मिळणार नाही. साईबाबा मंदिरातील लाडू केंद्र, प्रसादालयदेखील बंद ठेवलं जाणार आहे. संचारबंदीमुळं मंदिरातील वेळत बदल करण्यात आलाय. तसेच कॅन्टनची सुविधाही भाविकांसाठी बंद राहणार आहे. शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानने जारी केलेल्या नव्या आदेशानुसार, .प्रसादालयात एकाच वेळी एक हजारांहून अधिक भाविक प्रसाद भोजन करतात. मात्र, राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलीय. त्यानुसार, पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई आहे.
राज्यात गेल्या दोन दिवसात एक हजारापेक्षा जास्त पॉझिटिव्ह रुग्ण दिसून आले आहेत. ख्रिसमस उत्सव, लग्न समारंभ, नवीन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अन्वये संपूर्ण राज्यात काही अतिरिक्त निर्बंध लावण्याचे ठरवण्यात आले आहे.
काय आहेत निर्बंध?