ST Strike : एसटी महामंडळात मेगाभरती, एसटी पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी निर्णय
Maharashtra News : सुमारे 12 हजार लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गावर प्रति किलोमीटर प्रमाणे भाडेतत्त्वावर बसेस घेऊन चालवण्यात येणार असल्याची माहिती एबीपी माझा'ला वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

मुंबई : एसटी पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी लवकरच एसटी महामंडळात मेगाभरती करण्यात येणार आहे. लवकरच 11 हजार कंत्राटी चालक आणि वाहकांची एसटी महामंडळात भरती होणार आहे. अशी माहिती 'एबीपी माझा'ला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे. आज अखेर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारवाईपासून दिलासा आहे. उद्या पासून एसटी महामंडळातील हजर न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई आहे.
एसटी महामंडळात गाड्यांची संख्या देखील वाढवणार
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाईला सुरूवात करणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे. त्यानंतर एसटीने हे पाऊल उचलले आहे. एसटी महामंडळात गाड्यांची संख्या देखील वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे 12 हजार लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गावर प्रति किलोमीटर प्रमाणे भाडेतत्त्वावर बसेस घेऊन चालवण्यात येणार आहेत. बेस्ट आणि पीएमपीएलच्या धर्तीवर एसटी महामंडळात निर्णय हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती 'एबीपी माझा'ला वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाईला सुरूवात
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर उद्यापासून कारवाईला सुरूवात करणार आहे. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना सातवेळा संधी दिली मात्र कामावर रूजू न झाल्याने उद्यापासून कारावाईला सुरूवात करणार असल्याची माहिती, परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
अनिल परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याची मुभा आज संपत आहे. आज जे कर्मचारी हजर झालेले असतील त्यांच्यावर कारवाई करणार नाही. उपलब्ध कर्मचाऱ्यांना घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. तसेच 11 हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन एसटीची सेवा सुरू करत आहे. जे कामावर येत नाहीत म्हणजे त्यांना नोकरीची गरज नाही, त्यांच्यावर नियमानुसार केली जाणार आहे.
संबंधित बातम्या :
Gulabrao Patil : एसटी कर्मचाऱ्यांनी गोर गरीब जनतेचा विचार करावा, गुढी पाडव्याच्या दिवशी कामावर हजर व्हावं : गुलाबराव पाटील
ABP Majha Impact : अखेर विद्यार्थ्यांची पायपीट थांबली; सामाजिक कार्यातून लोकांची मदत, पण सरकारकडून व्यवस्था नाहीच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
