Gulabrao Patil : एसटी कर्मचाऱ्यांनी गोर गरीब जनतेचा विचार करावा, गुढी पाडव्याच्या दिवशी कामावर हजर व्हावं : गुलाबराव पाटील
एस टी कर्मचाऱ्यांनी त्वरित कामावर हजर होण्याचं आवाहन राज्याचे पाणी पुरवठा आणि जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं.
Gulabrao Patil : महाराष्ट्रातील गोर गरीब जनतेचा विचार करता, आपल्या मागण्या कायम ठेवत एस टी कर्मचाऱ्यांनी त्वरित कामावर हजर होण्याचं आवाहन राज्याचे पाणी पुरवठा आणि जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी केलं. एस टी कर्मचारी संपाचा अतिरेक होत आहे. कारण शाळकरी मुले, शेतकरी यांच्याही अडचणी एस टी कर्मचाऱ्यांनी समजून घ्यायला पाहीजेत. एस कर्मचाऱ्यांच्या मागणी पूर्ण करण्यासाठी सरकार आपल्याशी चर्चा करत असल्याचे पाटील म्हणाले.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी जनतेचा विचार करुन आपल्या मागण्या त्यांनी कायम ठेवत परवा येणाऱ्या गुढी पाडव्याच्या दिवशी कामावर हजर व्हावं अस आवाहन गुलाबराव पाटील यांनी केलं. एस टी कर्मचाऱ्यांचे नेते त्यांना चुकीचा मार्ग त्यांना दाखवत आहेत. नेत्यांना हे चांगलं माहीत आहे की, यापेक्षा जास्त काही आता होण्याची शक्यता आहे. नेते आपलं भल करीत आहेत असं समजून एस टी कर्मचारी त्यांच्या मागे आहेत. मात्र एस टी कर्मचाऱ्यांवर अवलंबून असलेल्या कुटुंबाचा विचार करता एस टी कर्मचारी नेत्यांनीही त्यांना कामावर हजर होण्याचं आवाहन करावं असेही गुलाबराव पाटील म्हणाले.
दरम्यान, कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मागण्या कायम ठेऊन कामावर हजर राहावे. एसटी कर्मचाऱ्यांचे नेते त्यांनी चुकीचे मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी डोक्यातील संभ्रम काढावा आणि कामावर हजर राहवे असे पाटील म्हणाले. दरम्यान, एसटी संपाबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही असे सांगितले आहे. 31 तारखे पर्यंत सर्व कामगारांनी कामावर यावं, असं आवाहन अनिल परब यांनी केलंय. एसटी कामगारांच्या आर्थिक बाबींबाबत शासन निर्णय घेईल. कामगारांना आर्थिक वाढ दिलीच आहे. इतर मागण्यांवर चर्चा करत मान्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत. सातवा वेतन अयोगाप्रमाणे तफावत देण्याचे मी मान्य केले नाही. इतर मागण्यांबाबत चर्चेची तयारी आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज्यातील एसटी कर्मचारी संपावर गेल्यापासून राज्यातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागत आहे. हे लक्षात घेता राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू होण्याची वारंवार आवाहन केले जात आहे. परंतु, अद्यापही राज्याच्या काही भागातील एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले नाहीत. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवर ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमुळं सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: