एक्स्प्लोर

'चंद्रकांत दादांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंतच', एकनाथ खडसेंची टीका

चंद्रकांत दादांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंतच आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर चंद्रकांत दादांचं नाव महाराष्ट्राला कळलं. एकदाही आमच्या आंदोलनात किंवा जेलमध्ये मी दादांना पाहिलं नाही. त्यांना फार सिरियसली घेऊ नका, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे

नाशिक : चंद्रकांत दादांची मर्यादा चॉकलेट ते कुल्फीपर्यंतच आहे. मंत्रिपद मिळाल्यानंतर चंद्रकांत दादांचं नाव महाराष्ट्राला कळलं. एकदाही आमच्या आंदोलनात किंवा जेलमध्ये मी दादांना पाहिलं नाही. त्यांना फार सिरियसली घेऊ नका, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे. खडसे म्हणाले की, मला पक्ष न सोडण्यासाठी कोणीही फोन केला नाही. फक्त चंद्रकांत दादांनी फोन केला होता. अन्यथा कोणालाही माझी गरज नव्हती. साधा संघटन मंत्र्यांचाही फोन आला नाही, तो आला असता तर मी किमान फेरविचार केला असता. आता भाजपमध्ये यूझ अॅन्ड थ्रोची पद्धत आहे, असं खडसे म्हणाले.

'12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात' कोणत्याही पक्षात स्पष्ट दिशा ठरलेली असते. संघटनात्मक विस्तार हे माझं यापुढचं ध्येय असेल, असं खडसे म्हणाले. राष्ट्रवादीसाठी खान्देशात काम करणं माझ्यासाठी मोठं आव्हान नाही. आमच्या भागात नाथभााऊ म्हणून 70 ते 80 टक्के मतं मिळत होती, भाजप किंवा राष्ट्रवादीचा म्हणून नाही.  12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत, ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असं खडसे म्हणाले.

'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक

सत्ता कोसळणार नाही सत्तेत असेल तिथं कार्यकर्ता वळतो अन्यथा पळतो. कार्यकर्ते थोपवण्यासाठी आपलं सरकार येणार असं सारखं सांगितले जात आहे. सत्तेत येण्यासाठी किमान 40 आमदारांची भाजपला गरज आहे, एक पूर्ण पक्ष जण्याशिवाय भाजप सत्तेत येत नाही. सध्यातरी मला सत्ता कोसळण्याची स्थिती वाटत नाही, असंही खडसे म्हणाले.

पूर्वी मारवाडी, ब्राह्मणांचा पक्ष म्हणून हिनवले जायचे. आता बहुजन चेहऱ्यांची पुन्हा  पक्षात वानवा आहे. आजही प्रशासनात माझ्या शब्दाला मोल आहे, त्यामुळे मंत्री बनण्याचा मला अट्टाहास नाही. कुठलीही तडजोड केलेली नाही, असं ते म्हणाले.

... म्हणून राष्ट्रवादीतच जाण्याचा निर्णय घेतला, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण

'राम शिंदे अभी बच्चा है'

फडणवीस यांनी योग्य वेळी बोलण्यापेक्षा सभागृहात मी विचारलं तेव्हा बोलायला हवं होतं. सभागृह सार्वभौम आहे. तिथं उत्तर देण्याला खूप महत्व असतं. तसंच अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या बातम्या बघून माझी आणि शरद पवारांची खूप करमणूक झाली, असंही खडसे म्हणाले.  मी कधीही सिंचन घोटाळ्याचे पुरावे घेऊन गाडीभरून गेलो नाही. मी त्यात नव्हतो. राम शिंदे अभी बच्चा है, असं म्हणत त्यांनी शिंदे यांच्या 'साक्षीदार फोडल्याच्या' आरोपाला उत्तर दिलं. ते म्हणाले, त्यांना अजून खूप शिकायचं आहे. त्याला मीच पाहिलं तिकीट दिलं होतं, असंही ते म्हणाले. सीडी, बिडी, ईडी हे राजकारणात फक्त श्लेश म्हणून वापरले जातात. माझ्याकडे असलेल्या पुराव्यांचा मी अभ्यास करतोय, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या  भेटीसाठी कोण कोण आलं? 
नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या भेटीसाठी कोण कोण आलं? 
5 crore seized : खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM :   22 ऑक्टोबर  2024: ABP MajhaNilesh Rane Full PC : निवडणूक जिंकायची हेच आमचं लक्ष्य; बाळासाहेबांवर प्रेम होतं; अजूनही आहे - राणेABP Majha Headlines :  1 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSandeep Naik Airoli : संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार; नवी मुंबईत मेळावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
शिवसेनेचं मशाल चिन्ह दाखवत उद्धव ठाकरेंचं महत्वाचं आवाहन; निवडणूक आयोगाबद्दल सांगितलं
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
अजित पवारांच्या खांद्यावर गदा; हिंद केसरी अन् महाराष्ट्र केसरी दीनानाथ सिंहांचा राष्ट्रवादीत प्रवेश
नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या  भेटीसाठी कोण कोण आलं? 
नाराज, बंडखोर आणि इच्छुकांच्या सागर बंगल्यावर रांगा, सकाळपासून फडणवीसांच्या भेटीसाठी कोण कोण आलं? 
5 crore seized : खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
खेड 5 कोटी जप्तीप्रकरणी मोठी अपडेट, पोलिसांनी वेगळाच अँगल सांगितला, संजय राऊतांचं शहाजीबापूंकडे बोट!
के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय?
राधानगरीत रंगत, के पी पाटील थेट मातोश्रीवर, प्रकाश आबिटकरांविरोधात उद्धव ठाकरेंचा प्लॅन काय?
खेड- शिवापूरमध्ये  'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता  25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
खेड- शिवापूरमध्ये 'रात्रीस खेळ चाले', पैशांचा व्हिडीओ ट्वीट; सत्ताधारी उमेदवारांना पहिला हप्ता 25 कोटींचा, रोहित पवारांचा आरोप
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
गाडीची पासिंग MH 45, नंबरही व्हीआयपी, खेड शिवापूरला पकडलेल्या 5 कोटींचं गौडबंगाल काय? सगळे अधिकारी अळीमीळी गुपचीळी!
Sandeep Naik from Belapur: वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
वडील भाजपमध्ये, मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीत, बाप-लेक निवडणूक लढवणार, विधानसभेला कोण जिंकणार?
Embed widget