एक्स्प्लोर

एकनाथ खडसेंकडून मोदींवर टीका करणारं रिट्वीट तासाभरातच डिलीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं एक ट्वीट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. तेच ट्वीट एकनाथ खडसे यांनी रिट्वीट केलं होतं. पण तासाभरातच त्यांनी हे रिट्वीट डिलीट केलं आहे.

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या राजकिय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं एक ट्वीट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. जयंत पाटलांचं हेच ट्वीट एकनाथ खडसे यांनी रिट्वीट केलं. खडसे यांची ही कृती सूचक मानली जात होती. तसेच त्यांनी ट्वीट रिट्वीट करून राष्ट्रवादी प्रवेशाचे संकेतच दिले असल्याचंही बोललं जात होतं. परंतु, त्यांनी तासाभरातच रिट्वीट केलेलं ट्वीट डिलीट केल्यानं पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खडसेंच्या भूमिकेसंदर्भात चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर टीका करणारं एक ट्वीट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. तेच ट्वीट एकनाथ खडसे यांनी रिट्वीट केलं होतं. खडसे यांची ही कृती म्हणजे राष्ट्रवादी प्रवेशासंदर्भातील संकेत असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात जोर धरला होता. परंतु, तासाभरातच त्यांनी ते रिट्वीट केलेलं ट्वीट डिलीट केल्यानंतर खडसेंच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

जळगाव जिल्ह्यात लागलेल्या खडसेंच्या पोस्टरमधून भाजपचं कमळही गायब झालं आहे. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने रंगत आहे. पण भाजप सोडून खडसे कुठेही जाणार नाहीत, असा दावा भाजपचे नेते करत आहेत. या पार्श्वभूमीवर खडसे यांनी ट्विटरवरुन दिलेले संकेत महत्त्वाचे मानले जात होते.

एकनाथ खडसे यांच्या पक्षांतरासाठी 17 ऑक्टोबरचा मुहूर्त मानला जात होता. मात्र हा मुहूर्त टळल्यानंतर आता 22 तारखेचा मुहूर्त असल्याच्या चर्चा पुन्हा जोर धरु लागल्या आहेत. स्वतः एकनाथ खडसे यांनी मात्र या सर्व चर्चांबाबत मौन बाळगलं आहे. कोणताही निर्णय झाल्यास तो आपण स्वतः कळवू असं सांगत त्यांनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.

पाहा व्हिडीओ : पंतप्रधान मोदींवर टीका करणारं जयंत पाटील यांचं ट्वीट एकनाथ खडसे यांच्याकडून रिट्वीट

जळगावातील खडसेंच्या पोस्टरमधून कमळ गायब

दरम्यान एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या शक्यतेनंतर कार्यकर्त्यांनी जळगावात पोस्टर लावले. कार्यकर्त्यांनी भाजपचं चिन्ह हटवत खडसे यांचे बॅनर आपल्या वाहनावर आणि रस्त्याच्या कडेला लावले आहेत. "भाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण," "भाऊ आम्ही सदैव आपल्यासोबत" असं बॅनरवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे समर्थकांची बॅनरबाजी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे.

एकनाथ खडसे नाराज

एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज आहेत. भाजपमध्ये आपल्याला सातत्याने डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यातून ते गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत. एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. मात्र, पक्षाच्या नेत्यांकडून कुठल्याही पद्धतीने विचारणा केली नाही किंवा कारवाई देखील केली नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं चर्चा आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Gadchiroli Accident News: आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
आई-वडील शेतातील कामात व्यस्त; आंघोळीसाठी नदीवर गेले अन्...; पाण्याचा अंदाज न आल्याने ३ चिमुकल्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
Jalgaon Rain: पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
Maharashtra Live blog updates: आंघोळीसाठी गेलेले 3 विद्यार्थी बुडाले; गडचिरोलीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना
Maharashtra Live blog updates: आंघोळीसाठी गेलेले 3 विद्यार्थी बुडाले; गडचिरोलीतील हृदय पिळवटून टाकणारी घटना
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Embed widget