Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
यसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये पुन्हा एकदा भारतीय टीमने भारताचा तिरंगा झेंडा हा फडकवलेला आहे. भारत पुन्हा चॅम्पियन झालेला आहे. आणि काल अनेक रेकॉर्ड तोडत ज्या प्रकारे न्यूझीलंडचा पराभव हा भारताने केला टी-ट्वेंटी सामन्यांच्या इतिहासामध्ये फायनल मध्ये अशा प्रकारचा स्कोर करणं आणि समोरच्या टीमला अशा पद्धतीने गारद करणं हा देखील एक नवीन रेकॉर्डच आहे. विशेषतः काल संजू सैमसन असतील अभिषेक शर्मा असतील यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली त्यामुळे एक अतिशय सॉलिड फाऊंडेशन हे भारताला मिळालं आणि बॉलिंग मध्येही जसप्रीत बुमराह यांनी ज्या प्रकारे पूर्ण सिरीज मध्ये अतिशय इकॉनॉमीने बॉलिंग केली आणि कालही त्यांनी ज्या प्रकारे न्यूझीलंडच्या टीमला गारद केलं ते विलक्षण अशा पद्धतीचं त्यांचं कार्य त्यांची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. अर्थातच एकूण टीमचा परफॉर्मन्स हा अतिशय उत्तम राहिलाय. केवळ एक सामना आपण हारलो बाकी कुठल्याच सामन्यात आपण त्या ठिकाणी पराजित झालो नाही. एक कन्विन्सिंग विन आपल्या संघाने मिळवलेली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीम या सर्वांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. आणि आपल्या मुंबईचे खेळाडू देखील या टीममध्ये उत्तम त्यांनी खेळ केला असल्यामुळे त्यांचेही शिवम असेल सूर्या असतील अशा सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो.





















