एक्स्प्लोर

थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका, चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंना भावनिक साद

एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज आहेत. भाजपमध्ये आपल्याला सातत्यानं डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यातून ते गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत.

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यात खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगू लागल्या होत्या. त्यामुळेच भाजप नेते खडसे यांची मनधरणी करताना दिसत आहेत. आजच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीला एकनाथ खडसे उपस्थित होते. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, खडसे आमचे समजदार नेते आहेत. आमचे पालक आहेत. आम्ही त्यांची मुलं आहोत. चॅनलवाले त्यांना तिकडे ढकलतायत, पण त्यांचे पाय आमच्यात रुतले आहेत. शेवटी खडसे पण एक माणूस आहेत. त्यांना भावना आहेत. त्यांना इतकंच सांगणं आहे की चुकत असेल तर थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका, अशी भावनिक साद चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना घातली आहे.

एकनाथ खडसे मोठ्या काळापासून भाजपवर नाराज आहेत. भाजपमध्ये आपल्याला सातत्यानं डावललं जात असल्याची एकनाथ खडसे यांची भावना आहे. त्यातून ते गेल्या अनेक दिवसांपासून अस्वस्थ आहेत. एकनाथ खडसे यांनी आपली नाराजी अनेकदा जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवली आहे. मात्र, पक्षाच्या नेत्यांकडून कुठल्याही पद्धतीने विचारणा केली नाही किंवा कारवाई देखील केली नाही. गेल्या काही दिवसांपासून ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्ले चढवत आहेत.

पुढे चंद्रकांत पाटलांनी विविध विषयांवर भाष्य केलं. चंद्रकांत पाटील यांनी एमपीएससी परीक्षा तिढ्याबाबत बोलताना म्हटलं की, सरकार झोपलंय का? या गंभीर विषयावर चर्चा करून तोडगा काढणं गरजेचं आहे. या सरकारने जागं व्हावं आणि हा संवेदशील विषय निकाली काढावा.

'एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर', प्रकाश आंबेडकरांची जहरी टीका

प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याबाबत त्यांनी म्हटलं की, अशा दोन घराण्यांबद्दल अनादर व्यक्त करणे योग्य नाही, आंबेडकर हे सुद्धा अत्यंत आदर असलेल्या एका घराण्यातील आहेत. प्रकाश आंबेडकर यांचे मत असू शकते पण भावना तशा नको हे आवाहन आहे.

भाजप कार्यकारिणी बैठकीत खलील ठराव मंजूर केले

- शेतावर जाऊन शिवार सभा घेऊन कृषी विधेयकबाबत जनजागृती करणार. - 300 हून कमी कामगार असलेल्यांना कंपन्या बंद करण्याचा अधिकार याचा गवगवा केला आणि इतर 40 कोटी असंघटित कामगारांबद्दल केलेय निर्णयांवर दुर्लक्ष केलं. यासाठी कारखान्यांनाच्या गेटवर गवत मिटिंग घेऊन हा कायदा आम्ही कामगारांना समजवणार. - 12 ऑक्टोबरला 'उद्धवा जागे व्हा!' हे तालुका आणि जिल्हा पातळीवरचं आंदोलन महिलांवर वाढत्या अत्याचाराविरोधात आंदोलन करणार आहोत. - शिवाजी पार्क ते चैत्यभूमी यासाठी लॉंग मार्च काढून निषेध व्यक्त करणार आहोत. - मराठा आरक्षणाबाबत सरकारला जाब विचारणार, अरक्षणावरची स्थगिती उठवण्यासाठी सरकारला मदर करणार.

संबंधित बातम्या 

Home Minister on Fake TRP | रिपब्लिक चॅनलच्या प्रमुखांना बनावट TRPबद्दल विचारणा होणारच - अनिल देशमुख
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार

व्हिडीओ

BMC Election Result : कार्यकर्त्यांना स्विकारलं ते घराणेशाहीला नाकारलं, धंगेकर, राजन विचारेंच्या पत्नीही पराभूत
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2026 : आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
आधी म्हणाले सामने श्रीलंकेत खेळवा, आता बांगलादेशची आयसीसीकडे मोठी मागणी, ICC काय निर्णय घेणार?
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध करुन देणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Embed widget