(Source: ECI/ABP News/ABP Majha)
... म्हणून राष्ट्रवादीतच जाण्याचा निर्णय घेतला, एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच का प्रवेश केला याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सोडून राष्ट्रवादीमध्येच का प्रवेश केला याबाबत त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एबीपी माझाशी बोलताना ते म्हणाले की, मला वाटलं राष्ट्रवादीत जावं, म्हणून हा निर्णय घेतला. या निर्णयाआधी मी कार्यकर्त्यांशी चर्चा केली. त्यांची देखील राष्ट्रवादीत प्रवेश करावा अशी भावना होती. सर्वांशी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे, असं खडसे म्हणाले. ते म्हणाले की, राष्ट्रवादीत प्रवेशासाठी मला कुठलंही आश्वासन नाही. माझीही काही अपेक्षा नाही. मला पदाची अपेक्षा नाही, मात्र माझ्या मतदारसंघातील विकासकामं सरकारच्या माध्यमातून पूर्ण केली जावीत एवढीच इच्छा आहे असं ते म्हणाले.
फडणवीसांवर टीकेचा भडीमार यावेळी खडसे म्हणाले की, पक्षात सगळीकडे देवेंद्र फडणवीस. त्यामुळं न्यायाची अपेक्षा संपली. निवडून येणारांची तिकिटं कापली. हक्काच्या जागा घालवल्या. हम करे सो कायदा या प्रकाराने निर्णय घेतले गेले. त्यामुळं सरकार आलं नाही. देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहेत तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही अशी माझी भावना झाली, म्हणून मी पक्ष सोडला. मी पक्षाला दोष दिला नाही, नेतृत्वाला दिला. एकाही नेत्याने भाजप सोडणार कळाल्यावर फोन केला नाही. चार दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी फोन केला. केंद्रीय नेतृत्वानं गांभीर्याने घेतलं नाही, असंही खडसे म्हणाले.
'जीवन उद्ध्वस्त करण्याचा फडणवीसांकडून प्रयत्न', भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एकनाथ खडसे भावूक
फडणवीसांना अहंपणा नडला फडणवीसांना टोमणा मारत खडसे म्हणाले की, त्यांचं व्यक्तिमत्व चांगलं आहे. देवेंद्रजींचं सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळंच महाराष्ट्रात सत्ता गेली. त्यांचा 'मी' पणा लोकांना आवडला नाही. 'आम्ही' म्हटलं असतं तर फरक पडला असता. ते सर्वांना सोबत घेऊन जात नाहीत. फडणवीसांना अहंपणा नडला, असं ते म्हणाले.
पक्षात आम्ही काय आयतं आलेलो नव्हतो खडसे म्हणाले की, मी नालायक असतो तर 40 वर्षात एकाचही वाईट मत कसं आलं नाही. हेतूपरस्पर मला त्रास दिला गेला. तिकिट दिलं नाही याचं दुख नाही. पण आरोप केले याचं दु:ख आहे. पक्षात आम्ही काय आयतं आलेलो नव्हतो. आम्ही पक्षासाठी काम केलं होते. पक्षात आपली गरज नाही हे लक्षात आलं म्हणून पक्ष सोडला असल्याचं ते म्हणाले.
नेतृत्व करतात त्यांच्यावर राग असतो खडसे म्हणाले की, अंजली दमानिया यांनी माझ्या विरोधात विनयभंगाची केस दाखल केली. देवेंद्र फडणवीस यांनी त्याला परवानगी केली. नेतृत्व करतात त्यांच्यावर राग असतो. देवेंद्र नेतृत्व करायचे त्यामुळं त्यांच्यावर राग आहे. आमचा दोष नसताना आमचा राजीनामा घेतला. ज्यांच्यावर आरोप होते असे अनेकजण मंत्रिमंडळात घेतले. काही गुन्हा नसताना मला शिक्षा का? असं ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- एकनाथ खडसेंकडून मोदींवर टीका करणारं रिट्वीट तासाभरातच डिलीट
- मोदींवर टीका करणारं जयंत पाटील यांचं ट्वीट एकनाथ खडसेंकडून रिट्वीट
- राष्ट्रवादी प्रवेशावर एकनाथ खडसे म्हणाले, 'माझ्या प्रवेशाबाबतचे सारे मुहूर्त तुमचेच'
- नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार, समर्थक उदेसिंग पाडवी यांचा दावा
- उत्तर महाराष्ट्रातील भाजपचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?
- थोबाडीत मारा पण सारखं त्या दांडक्यांसमोर जाऊ नका, चंद्रकांत पाटलांची एकनाथ खडसेंना भावनिक साद
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात...
- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाबाबतच्या चर्चांवर एकनाथ खडसे म्हणतात...